बॉलीवूडचे कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटातील भूमिकेमुळे, कधी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे; तर कधी त्यांनी खासगी आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केल्यामुळे हे कलाकार सतत चर्चांचा भाग बनतात. आता अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्याने केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाला रणबीर कपूर?

निखिल कामथच्या यूट्यूब पॉडकास्टला रणबीरने मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने स्वत:च्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. अभिनेत्याने या मुलाखतीत, “आपण दोन यशस्वी अभिनेत्रींना डेट केले आणि तीच माझी ओळख बनली होती. माझ्या आयुष्यातला खूप मोठा काळ मी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवतो, अशी माझी प्रतिमा झाली असून आतादेखील ती काही प्रमाणात आहे. जेव्हापासून मी बॉलीवूडमध्ये काम करत आहे, लोक माझ्याकडे याच नजरेने बघतात. जरी माझी गणना यशस्वी अभिनेत्यांमध्ये होत असली, तरी माझे खासगी आयुष्य आणि दोन यशस्वी अभिनेत्रींना डेट केल्याची गोष्ट माझ्या यशस्वी कारकिर्दीवर वरचढ ठरते. जेव्हा मला प्लेबॉय म्हटले जाते किंवा मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवतो अशी माझ्याबद्दल चर्चा केली जाते, तेव्हा मला त्रास होतो. कारण लोकांना संपूर्ण गोष्ट माहीत नाही, त्यांना सगळे सत्य माहीत नाही. मला माझ्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी खासगी ठेवायला आवडतात”, असे रणबीरने म्हटले आहे.

हेही वाचा: मिसेस कपूर होण्याआधी आलियाने सोडलेली ‘ती’ सवय; रणबीर कपूरने बायकोबद्दल केला खुलासा; म्हणाला, “वयाची ३० वर्षे…”

अभिनेता रणबीर कपूर हा दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांच्याबरोबर नात्यात होता. दीपिकाने ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात रणबीरबद्दल काही विधाने केली होती. त्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

दरम्यान, या मुलाखतीत अभिनेत्याने वडिलांबरोबर असलेले नात्यावरदेखील भाष्य केले आहे. तो म्हणतो की, माझ्या वडिलांशी असहमती दर्शवण्याची माझी कधीच हिंमत झाली नाही. माझ्या बालपणी मी कधीच त्यांच्या डोळ्यांचा रंग बघितला नाही. मी कायम त्यांच्यासमोर खाली मान घालून असायचो. माझे वडील खूप चांगले होते, पण त्यांना लगेच राग यायचा. मी त्यांना कोणत्याही गोष्टीला कधीच नाही म्हटले नाही. पुढे त्याने ऋषी कपूर यांना जेव्हा दवाखान्यात दाखल केले होते, त्यावेळची आठवण सांगितली आहे. डॉक्टरांनी जेव्हा वडिलांचे निधन कधीही होऊ शकते असे सांगितले होते, त्यावेळी त्याला पॅनिक अ‍टॅक आल्याचे सांगितले आहे.