बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी एप्रिल २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. पुढे काही महिन्यांतच आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. रणबीर-आलिया सध्या अनेक मुलाखतींमध्ये आपल्या लेकीबद्दल बोलताना दिसतात.
हेही वाचा : “तू खोटारडी आहेस…” सान्या मल्होत्राने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “शाहरुखबरोबर जवानमध्ये…”
रणबीरला अलीकडेच एका मुलाखतीत, तुझ्या लेकीची म्हणजेच राहाची सर्वात चांगली काळजी बॉलीवूडमधील कोणता सेलिब्रिटी घेईल, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर रणबीरने शाहरुख खानचे नाव घेतले. रणबीर म्हणाला, “शाहरुख राहाची चांगली काळजी घेईल, तिच्यासाठी शाहरुख परफेक्ट बेबीसिटर असेल. मला विश्वास आहे की, त्याने हात बाजूला करून त्याची सिग्नेचर पोझ केली तरी राहा आनंदित होईल.” रणबीरने दिलेले हे उत्तर सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.
हेही वाचा : अभिनेत्री वैभवी उपाध्यायच्या निधनानंतर ‘प्लीज फाइंड अटॅच्ड’ फेम आयुष-बरखाने शेअर केली भावूक पोस्ट, म्हणाले…
शाहरुख खानला आर्यन, सुहाना आणि अबराम अशी तीन मुले आहेत. सोशल मीडियावर शाहरुख आपल्या मुलांबरोबरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करीत असतो. दुसरीकडे रणबीर-आलियाने मात्र लेक राहाचे फोटो सोशल मीडियावर न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. आलियाने आतापर्यंत असा एकही फोटो पोस्ट केलेला नाही ज्यामध्ये राहाचा चेहरा दिसत असेल.
हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्मा कशी करते मुलांना Impress? अभिनेत्रीने दिलेले उत्तर ऐकून तुम्ही व्हाल थक्क!
दरम्यान, रणबीर कपूर लवकरच दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाबरोबर ‘अॅनिमल’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा करीत आहेत.