Ranbir Kapoor And Alia Bhatt : आलिया भट्ट व रणबीर कपूर यांच्याकडे कलाविश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. एकमेकांना जवळपास ५ वर्षे डेट केल्यावर या दोघांनी एप्रिल २०२२ मध्ये लग्न केलं. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलिया-रणबीरमध्ये खूप चांगली मैत्री झाली. यानंतर या मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. या जोडप्यामध्ये जवळपास १० वर्षांचं अंतर आहे. आलिया रणबीरपेक्षा वयाने लहान असल्याने सुरुवातीच्या काळात यांना प्रचंड ट्रोल केलं गेलं. परंतु, आलिया रणबीरने सर्वांना आपलं बॉण्डिंग सिद्ध करून दाखवलं. नुकत्याच निखिल कामथला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने आपली बायको व वैवाहिक जीवनाबद्दल खुलासा केला आहे.

रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर आलियाने स्वत:मध्ये अनेक बदल केल्याचं यावेळी रणबीरने मान्य केलं. अभिनेता म्हणतो, “आपलं लग्न झाल्यावर आपल्याला दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी व सवयींमध्ये बदल करावा लागतो. आपलं मूळ व्यक्तिमत्त्व बाजूला सारून विचार करावा लागतो. आलिया अन् माझं सुद्धा असंच आहे. प्रत्येक गोष्टीत एकमेकांना जास्तीत जास्त समजून घेण्याचा आमचा प्रयत्न असतो.”

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका

हेही वाचा : Bigg Boss Marathi : प्रतीक्षा संपली! अखेर ‘बिग बॉस’च्या घराची पहिली झलक आली प्रेक्षकांसमोर… पाहा Inside व्हिडीओ

आलियाबद्दल काय म्हणाला रणबीर? ( Ranbir Kapoor And Alia Bhatt )

रणबीर पुढे म्हणाला, “याचं उदाहरण सांगायचं झालं तर, आलिया आधी खूप मोठ्या आवाजात बोलायची. माझे वडील सुद्धा आमच्याशी तसेच बोलायचे…त्या मोठ्या आवाजाचा मला त्रास व्हायचा. तिला सगळं समजल्यावर आलियाने मोठ्या आवाजात बोलणं पूर्णपणे कमी केलं. जेव्हा तुम्ही वयाची ३० वर्षे असे वागता अन् अचानक तुम्हाला कोणीतरी बदल करायला सांगितला तर निश्चित ती गोष्ट करणं अवघड जातं. पण, तिने माझ्यासाठी तो बदल केला.”

“आलिया माझ्यासाठी खूप बदलली…मी सुद्धा तिच्यासाठी बदलण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्याकडे पाहून मला नेहमी आपणही बदललं पाहिजे…तिला हवं तसं वागलं पाहिजे असं वाटतं” असं रणबीर कपूरने सांगितलं. रणबीर-आलिया नेहमीच एकमेकांना खंबीरपणे साथ देताना दिसतात. या दोघांना राहा नावाची गोंडस मुलगी आहे. या जोडप्याप्रमाणे राहा सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे.

हेही वाचा : “वडील गेल्यावर रडलो नाही”, ऋषी कपूर यांच्या निधनाच्या आदल्या रात्री काय घडलं? रणबीर म्हणाला, “डॉक्टरांनी मला…”

रणबीरबरोबर रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर आलियाच्या वागण्या-बोलण्यात सुरुवातीपेक्षा प्रचंड बदल झाल्याचं तिच्या चाहत्यांना देखील जाणवलं होतं. आता मुलाखतींमध्ये देखील अभिनेत्री फार विचारपूर्वक बोलते. याकडे आलिया अतिशय सकारात्मकतेने पाहते व याचं संपूर्ण श्रेय आपल्या नवऱ्याला देत असते.

Ranbir Kapoor And Alia Bhatt
रणबीर – आलिया ( Ranbir Kapoor And Alia Bhatt )

दरम्यान, रणबीर कपूर शेवटचा ‘अ‍ॅनिमल’ मध्ये झळकला होता. त्याच्याबरोबर या चित्रपटात रश्मिका मंदाना, बॉबी देओल, तृप्ती डिमरी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या लवकरत आलिया-रणबीर ( Ranbir Kapoor And Alia Bhatt ) संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटात झळकणार आहेत.

Story img Loader