Ranbir Kapoor : बॉलीवूडमधल्या हरहुन्नरी अभिनेत्यांच्या यादीत रणबीर कपूरचं नाव घेतलं जातं. आजवर त्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. प्रत्येक चित्रपटात रणबीरचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळतो. रणबीरला अभिनयाचा हा वारसा घरातूनचा लाभला आहे. तो दिवगंत अभिनेते ऋषी कपूर व नीतू सिंग यांचा धाकटा मुलगा आहे. वडिलांचं निधन झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस रणबीरसाठी खूप कठीण होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रणबीर ( Ranbir Kapoor ) लहान असताना त्यांचं वडिलांबरोबर फारसं चांगलं बॉण्डिंग नव्हतं… दोघांमध्ये एक विशिष्ट ‘अंतर’ होतं. मात्र, ऋषी कपूर आजारी पडल्यावर संपूर्ण परिस्थिती बदलली. ‘तुझ्या वडिलांचं आता कधीही निधन होऊ शकतं…त्यांच्यासाठी ही शेवटची रात्र आहे’ डॉक्टरांनी असं सांगितल्यावर रणबीरला रुग्णालयातच पॅनिक अटॅक आला होता. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी लढा दिल्यावर २०२० अभिनेते ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला होता. याबद्दल निखिल कामथला दिलेल्या मुलाखतीत रणबीरने खुलासा केला आहे. या मुलाखतीत अभिनेता सांगतो, “माझं लहानपणापासून वडिलांवर खूप ‘प्रेम’ होतं, पण त्यांच्याशी फारसं चांगलं बॉण्डिंग नव्हतं. आम्ही नेहमी ठराविक ‘अंतर’ ठेवून वागायचो. आमच्यातलं ते ‘अंतर’ त्यांच्या शेवटच्या दिवसांत कमी झालं.”
हेही वाचा : ‘गुलाबी साडी’ गाणं का लिहिलं? संजू राठोडने सांगितलं खास कनेक्शन! फक्त एका तासात रचली चाल
वडिलांच्या निधनाच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं?
“माझ्या वडिलांचं निधन झाल्यावर मी रडलो नाही…मी रडणं बंद केलं होतं. कारण, त्यांचं निधन झालं त्याच्या बरोबर आदल्या रात्री डॉक्टरांनी मला याबद्दल सांगितलं होतं. ‘त्यांची ही शेवटची रात्र आहे…त्यांचं कधीही निधन होऊ शकतं’ डॉक्टरांचे ते शब्द ऐकून मला काहीच सुचत नव्हतं. मला आठवतंय मी एका खोलीत गेलो आणि एवढा घाबरलो की मला पॅनिक अटॅक आला. मला आपलं दु:ख कसं व्यक्त करायचं हे माहीत नव्हतं. त्यानंतर मग आयुष्यात माझं किती मोठं नुकसान झालंय याची जाणीव मला झाली.” असं रणबीरने सांगितलं.
रणबीर ( Ranbir Kapoor ) पुढे म्हणाला, “माझ्या वडिलांनी शेवटच्या काही दिवसांत न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतले होते. ते एक वर्ष आम्ही सर्व कुटुंबीयांनी एकत्र घालवलं. मी तिथे ४५ दिवस होतो. एक दिवस ते ( ऋषी कपूर ) माझ्याजवळ आले अन् रडू लागले. ते त्या दिवसांपर्यंत माझ्यासमोर असे कधीच रडले नव्हते. त्यामुळे माझ्यासाठी तो प्रसंग खूप वेगळा होता. त्यांना मिठी मारावी की नाही हे सुद्धा मला माहिती नव्हतं. त्यावेळी आमच्यात किती ‘अंतर’ आहे याची मला जाणीव झाली. त्यादिवशी मला खूप जास्त अपराधी वाटलं… कारण, आमच्यातलं ‘अंतर’ कमी करून मी त्यांना मिठी मारू शकलो नाही.”
रणबीर कपूरने कुटुंबीयांना दिली खंबीर साथ ( Ranbir Kapoor )
“घरात असं काही घडतं तेव्हा संपूर्ण परिस्थिती बदलून जाते. वडिलांच्या जाण्यानंतर आज मागे माझी आई, बहीण, पत्नी, माझं बाळ आहे. त्यामुळे मी त्यांच्यासमोर माझं दु:ख दाखवू शकतो का? त्यांच्यासाठी खंबीर राहिलं पाहिजे असा विचार मी केला…अन् त्यांच्यासमोर कधीच दु:ख व्यक्त केलं नाही.” याशिवाय रिद्धिमा कपूरने सुद्धा अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत वडिलांचं निधन झाल्यावर आम्ही सगळे कुटुंबीय भावनिकदृष्ट्या जास्त एकत्र आलो असं सांगितलं होतं.