बॉलीवूडचे कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट, कधी त्यांचे चित्रपट, तर कधी त्यांची वक्तव्ये यांमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता अभिनेता रणबीर कपूर( Ranbir Kapoor) ने मानसिक आरोग्यावर वक्तव्य केल्याने तो चर्चेत आला आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेता रणबीर कपूरने निखिल कामथच्या यूट्यूब पॉडकास्टला मुलाखत दिली होती. यावेळी त्याने त्याच्या अनेक खासगी गोष्टींबाबत वक्तव्य केले आहे. आई-वडिलांची भांडणे, बहिणीबरोबरचे नाते, मुलगी राहाच्या जन्मानंतर बदललेले त्याचे आयुष्य, दोन यशस्वी अभिनेत्रींना डेट केल्यानंतर मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवतो, अशी मिळालेली ओळख, लग्नानंतर आलियाने त्याच्यासाठी तिच्यामध्ये केलेले बदल या सगळ्यांबरोबरच अभिनेत्याने मानसिक आरोग्याविषयीदेखील वक्तव्य केले आहे.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Milind Gawali
“या पाच वर्षांत…”, ‘आई कुठे काय करते’मधील भूमिकेबद्दल मिलिंद गवळींचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “अनिरुद्धला…”
Navjot Singh Sidhu
“अर्चना पूरन सिंगच्या जागी मी पुन्हा यावं…” नवज्योत सिंग सिद्धूंचे वक्तव्य; कपिल शर्मा शोमध्ये परतणार का?
Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

काय म्हणाला रणबीर?

रणबीरने निखिल कामथबरोबर बोलताना म्हटले, “माझे वडील आजारी पडण्याआधी मी मानसोपचार घेतले होते; पण त्याचा मला उपयोग झाला नाही. याचे पहिले कारण म्हणजे त्या तज्ज्ञांसमोर मी पूर्णपणे व्यक्त होत नसे आणि दुसरे असे की, मानसोपचार तज्ज्ञ मला एक प्रकारे आयुष्य कसे हाताळायचे हे मला शिकवत होते. मला वाटते की, काही गोष्टी तुम्ही स्वत:च शिकू शकता. माझे तज्ज्ञ जे काही मला सांगत होते, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की, मला माझ्या आयुष्यातून काही गोष्टींपासून पळ काढायचा नाही. मला माझ्या काही भावना यासाठी बाजूला सारायच्या नाहीत की त्यामुळे मला शांती मिळते.”

हेही वाचा: Video: धनंजय पोवारचा इरिनाबरोबर ‘भूतानी पछाडलं’ गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स, नेटकरी म्हणाले, “कल्याणी वहिनी दादाकडे लक्ष द्या…”

मानसिक आरोग्याबाबतच्या समस्या हाताळणे गरजेचे असल्याचे सांगताना रणबीरने म्हटले आहे की, अनेक जण अशा परिस्थितीचा फायदा घेतात आणि आपल्या जबाबदाऱ्या टाळतात. पण, मला वाटते की, मानसिक आरोग्य अशी गोष्ट आहे; जी शांतपणे व आकर्षक पद्धतीने हाताळली जाऊ शकते. गोष्टी न करण्यासाठी हे निमित्त म्हणून वापरू नका. ही समस्या आहे, त्यावर उपाय शोधा आणि त्यावर काम करीत राहा, असे त्याने म्हटले आहे.

जे पुरुष सहज दुखावले जाऊ शकतात, त्यांना सहजपणे ते सांगता येत नाही. त्याबाबत त्याने म्हटले की, तुम्ही मोकळेपणाने त्या संदर्भात बोलू शकत नाही. कारण- अनेक जण तुम्हाला स्त्रीवादीविरोधी म्हणण्याची शक्यता असते; पण पुरुष असो वा स्त्री, ज्यांना आपण मानसिकदृष्ट्या ठीक नाही, असे वाटते, त्यांनी मदत घेतली पाहिजे. मदत घेण्यात वा रडण्यात कोणत्याही प्रकारची लाज नाही आणि जे लोक तुमच्यावर प्रेम करतात, ते तुम्हाला समजून घेतात.

रणबीर कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ आणि संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अ‍ॅण्ड वॉर’मध्ये दिसणार आहे.