रणबीर कपूर गेल्या काही काळापासून त्याच्या चित्रपट ‘तू झुठी मैं मक्कर’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होता, ज्यासाठी अभिनेत्याने मीडियाशी भरपूर संवाद साधला. चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगलाच हीट ठरला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीरने त्याची बहीण आणि प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खानच्या ‘व्हॉट वुमन वॉन्ट’ या टॉक शोमध्ये हजेरी लावली. या नव्या सीझनचा पहिला पाहुणा म्हणून रणबीरने हजेरी लावली.

या मुलाखतीमध्ये रणबीरने मनमोकळ्या गप्पा मारल्या. नुकताच या मुलाखतीमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या टॉक शोमध्ये एका खेळादरम्यान रणबीर कपूरने मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेदवर टीका केली आहे. खरंतर या खेळात अभिनेत्रीचा चेहेरा नव्हे तर तिने परिधान केलेले कपडे पाहून ‘गुड टेस्ट’ किंवा ‘बॅड टेस्ट’ असं उत्तर देणं अपेक्षित असतं. याचदरम्यान उर्फीच्या एका फोटोवर रणबीरने टिप्पणी केली आहे.

why asha bhosle and lata mangeshkar always wore white saree
मी आणि दीदी नेहमी पांढऱ्या साड्या नेसायचो कारण…; आशा भोसलेंनी सांगितली आठवण, म्हणाल्या, “रंगीत साड्या नेसल्या तर…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
हिंदूंनी पारंपारिक कपडे घालावेत आणि इंग्रजी बोलू नये; मोहन भागवत असं का म्हणाले? (फोटो सौजन्य पीटीआय)
मोहन भागवत म्हणतात, ‘हिंदूंनी पारंपरिक कपडे घालावेत आणि इंग्रजी बोलू नये’
Ishika Taneja takes diksha left showbiz mahakumbh 2025
प्रसिद्ध अभिनेत्रीने कुंभमेळ्यात घेतली दीक्षा, ३० व्या वर्षी ग्लॅमरविश्व सोडले; म्हणाली, “स्त्रिया लहान कपडे घालून नाचायला…”
Bollywood actor shah rukh khan fixes daughter suhana khan dress video viral
Video: पापाराझींसमोर लेकीचे कपडे नीट करताना दिसला शाहरुख खान, सुहानाबरोबरचा व्हिडीओ व्हायरल
vidya balan distributes food and clothes to needy people video viral
Video: गरजूंना वाटले कपडे अन् वडापाव; बॉलीवूड अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “माणुसकी अजून जिवंत आहे”
Madhugandha Kulkarni passed Hemant dhome movie fussclass dabhade
“आपल्या मातीतल्या गोष्टी….”, मधुगंधा कुलकर्णीने ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचं केलं कौतुक; म्हणाली, “‘ॲनिमल’, ‘पुष्पा’ असे…”
Loksatta viva Fashion and Statement Influencers Presidential Inauguration
फॅशन आणि ‘स्टेटमेंट’

आणखी वाचा : ‘हेरा फेरी ३’मधील ‘या’ गोष्टीवर चाहते नाराज; अक्षय कुमार कुमारला खुलं पत्र लिहीत व्यक्त केली खदखद

या फोटोपैकी एक फोटो उर्फीचा होता, आणि तो पाहताच रणबीरने ‘बॅड टेस्ट’ म्हणजेच ‘कपड्यांमधील किंवा फॅशनमधील वाईट निवड’ अशी टिप्पणी करत रणबीरने उत्तर दिलं आहे. याविषयी बोलताना पुढे रणबीर म्हणाला, “अशाप्रकारच्या फॅशनचा मी चाहता नाही, पण आज आपण अशा जगात वावरत आहोत जिथे एखाद्या व्यक्तीला जे योग्य वाटतं ते ती परिधान करू शकते.”

उर्फीने गेल्या काही दिवसांत बॉलिवूड सेलिब्रिटीजचं लक्ष वेधून घेतलं आहे. बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटीजनी उर्फीच्या हिंमतीची दादही दिली आहे. अशातच रणबीर कपूरचं हे असं वक्तव्य पाहून उर्फीला कदाचित वाईट वाटू शकतं. रणबीरचा ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटीचा टप्पा पार केला आहे. याबरोबरच रणबीरच्या आगामी ‘अॅनिमल’ या चित्रपटाची सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत.

Story img Loader