रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर ही फ्रेश जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक लव रंजनचा बहुप्रतीक्षित रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘तू झूठी मैं मक्कार’चा ट्रेलर नुकताच एका मोठ्या कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला असून, याला प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘पठाण’बरोबर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार होता, पण २ दिवस आधीच ट्रेलर आल्याने प्रेक्षकांना चांगलंच सरप्राइज मिळालं आहे. ‘ब्रह्मास्त्र’नंतर रणबीरच्या या चित्रपटाची चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात होते.

या ट्रेलरमध्ये मुख्य जोडी रणबीर आणि श्रद्धामधील उत्कृष्ट केमिस्ट्री, उत्कृष्ट व्हिज्युअल्स, उत्तम संवाद आणि एक वेगळी संकल्पना पाहायला मिळत आहे. याबरोबरच हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणेच मजेदार, ट्विस्टने भरपूर आणि रिलेटेबल असेल यात काहीच शंका नाही. ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटातून पुन्हा रोमॅंटिक चित्रपटांचा आनंद प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर बघताना मिळणार आहे.

How To Make Dahi Mirchi dahi mirchi recipe in Marathi
झणझणीत दही मिरची; दोन भाकऱ्या जास्त खाल या दह्यातल्या मिरचीसोबत, ही घ्या सोपी मराठी रेसिपी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Mid Day Meal
Mid-Day Meal : विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंडा पुलाव, गोड खिचडी, नाचणी सत्व देण्याचा पर्याय; शालेय शिक्षण विभागाची माहिती
Tawa Prawn Masala Recipe In Marathi)
नॉनव्हेज प्रेमींसाठी खास ‘झणझणीत तवा प्रॉन्स मसाला’ रेसिपी, रविवारी बेत कराच…
tushar suryavanshi conversation with padamashri sabarmatee
आपल्याला काय हवे? सकस आहार, की दुर्धर आजार?
Fried Modak Recipe
Modak Recipe : माघी गणेश जयंतीला फक्त १ वाटी गव्हाच्या पिठाचे बनवा कुरकुरीत ‘मोदक’; रेसिपी वाचा पटकन
Khandeshi Shev Bhaji Recipe In Marathi
अस्सल झणझणीत खानदेशी शेव भाजी, रेसिपी वाचून तोंडाला सुटेल पाणी
Masale Bhaat Recipe
Masale Bhaat Recipe : घरीच बनवा लग्नसमारंभात बनवला जाणारा मसाले भात, अगदी सोपी आहे रेसिपी, पाहा VIDEO

आणखी वाचा : “जर चित्रपट नसतील तर…” बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडवर करीना कपूर खानचं मोठं वक्तव्य

या चित्रपटाद्वारे सीनेसृष्टीत पदार्पण करणार्‍या स्टँड-अप किंग अनुभव सिंग बस्सी यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते ज्यात हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान ‘झूठी’ श्रद्धा कपूर आणि ‘मक्कार’ रणबीर कपूर यांनी दिग्दर्शक लव रंजनसोबत गप्पागोष्टी करत चित्रीकरणादरम्यानचे किस्से सांगत सर्वांचे मनोरंजन केले. शिवाय या चित्रपटाच्या माध्यमातून संगीतकार प्रीतम, गीतकार अमिताभ भट्टाचार्य आणि गायक अरिजित सिंग यांची जादू या चित्रपटातील गाण्याच्या माध्यमातून पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.

प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून एका रॉम-कॉम चित्रपटाची वाट बघत होते आणि ‘तू झूठी मैं मक्कार’या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची ती इच्छा पूर्ण होत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना चांगलाच पसंत पडला असून रणबीर आणि श्रद्धा या फ्रेश जोडीसाठी त्यांचे चाहते चांगलेच उत्सुक आहेत. लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित ‘तू झूठी मैं मक्कार’या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. तसेच, टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमार हे हा चित्रपट सादर करणार आहेत. हा चित्रपट ८ मार्च २०२३ म्हणजेच होळीच्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader