शाहरुख, सलमान आणि आमिरनंतर आता पुढच्या पिढीचा सुपरस्टार हा रणबीर कपूर आहे हे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या यशाने सिद्ध केलं आहे. २०२३ च्या अखेरीस रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला अन् बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला. चित्रपटाचा विषय, सादरीकरण अन् त्यातील आक्षेपहार्य दृश्य यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला, पण तरी याने बॉक्स ऑफिसवर ९०० कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटामुळे रणबीरच्या लोकप्रियतेमध्ये आणखीनच वाढ झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच रणबीरला त्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘लोकमत’तर्फे ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ हा पुरस्कार देण्यात आला. नुकताच हा समारंभ मुंबईत पार पडला. रणबीर कपूरला हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्या हस्ते देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना रणबीरने त्याच्या आयुष्यातील तीन महत्त्वाच्या नियमांबद्दल खुलासा केला. आपल्या आयुष्यात या तीन नियमांमुळेच रणबीर आज एवढं यश मिळत असल्याचंही रणबीरने स्पष्ट केलं.

आणखी वाचा : ‘लाल सलाम’मधील गाण्यांसाठी AI चा वापर करणाऱ्या ए आर रेहमान यांच्यावर प्रेक्षक संतापले; नाराजी व्यक्त करत म्हणाले…

यावेळी भाषण देताना रणबीरने प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांनी दिलेल्या एका शिकवणीचा खुलासा केला. रणबीर म्हणाला, “माझं सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं ध्येय म्हणजे उत्तमोत्तम काम करत राहणं. मी मुकेश अंबानी यांच्याकडून बरेच सल्ले घेतले आहेत. मान खाली घालून मेहनत करायची अन् यश डोक्यात जाऊ द्यायचं नाही अन् अपयश मनाला लावून घ्यायचं नाही हा जीवनातला मोठा धडा मी त्यांच्याकडूनच शिकलो.”

यापुढे रणबीरने त्याच्या मनात मुंबईविषयीअसलेल्या खास प्रेमाचाही उल्लेख केला. तो म्हणाला, “माझ्या आयुष्यातील दुसरं ध्येय आहे ते म्हणजे मला एक उत्तम माणूस व्हायचं आहे. मला एक चांगला मुलगा, चांगला पिता, चांगला पती, चांगला मित्र आणि भाऊ व्हायचं आहे. त्याहूनही सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला एक चांगलं नागरिक बनायचं आहे. मी मुंबईकर आहे अन् याचा मला प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे हे असे पुरस्कार माझ्यासाठी फारच खास आहेत.”

रणबीरला हा पुरस्कार जितेंद्र यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी हा पुरस्कार देताना जितेंद्रदेखील खूप भावुक झाले. ते म्हणाले, “हा पुरस्कार तुम्ही माझ्या अत्यंत जवळच्या आणि लाडक्या मित्रांच्या मुलाला म्हणजेच रणबीरला दिला जाणार असल्याचं जेव्हा मला समजलं तेव्हापासूनच मी या सोहळ्यात काय बोलू याचा सराव करत होतो. माझ्या अत्यंत खास मित्र ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीरला हा पुरस्कार मिळाला आहे. आज तो ज्या ठिकाणी येऊन पोचला आहे त्यामागे केवळ त्याची मेहनत आणि जिद्द आहे. त्यामुळे मला हा पुरस्कार त्याला देताना फार आनंद होत आहे.” ‘रणबीर आता लवकरच नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’मध्ये झळकणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor speaks about three rules he lives by and one advice from mukesh ambani avn