गेल्या काही वर्षांमध्ये बॉलीवूडमध्ये अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपट प्रदर्शित झाले. यातील काही चित्रपटांना प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला तर काहींकडे पाठ फिरवली. तर आता ‘रामायण’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटासाठी रणबीर कपूर चांगलीच मेहनत घेत असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती,

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटामध्ये रणबीर कपूर श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी या चित्रपटामध्ये सीतेची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी रणबीर कपूर त्याच्या आयुष्यातील अनेक सवयींचा त्याग करणार असल्याची चर्चा होती. या भूमिकेसाठी रणबीरने मद्यपान तसेच मांसाहार बंद केल्याचं सांगितलं जात होतं. आता खुद्द रणबीरनेच यावर भाष्य केलं आहे.

Nana Patole on Ravindra Dhangekar
Nana Patole: रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडणार? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “काही लोक व्यावसायिक…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
Devotee Angry on yogi adityanath and Narendra modi after stampede in maha kumbha mela
महाकुंभातील भक्त योगी-मोदींवर नाराज का?
Shahid Kapoor
“जवळच्या गोष्टींचा त्याग…”, ‘देवा’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने केली ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”
Urvashi Rautela
उर्वशी रौतेलाने ट्रोल करणाऱ्यांना दिलं उत्तर; म्हणाली, “लोक सलमान खान आणि शाहरूख खानला सोडत नाहीत तर…”
response on loksatta article
लोकमानस : चिंता सर्वांनाच, दखल मात्र नाही!
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या…”, या वक्तव्यानंतर मंत्री विखेंची सारवासारव; म्हणाले, “मी गंमतीने…”

आणखी वाचा : जॅकी श्रॉफला ‘मारण्यासाठी’ मिळणार होते १० लाख रुपये; दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी सांगितला किस्सा

‘झुम’शी संवाद साधताना रणबीर म्हणाला, “रामायण हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि यासाठी खूप मेहनत गरजेची आहे. अद्याप काहीही ठरलेलं नाही. मी आशा करतो लवकरच सगळ्या गोष्टी समोर येतील. मी सुद्धा याविषयी बऱ्याच गोष्टी ऐकतो आहे पण अद्याप मी कशासाठीही होकार दिलेला नाही.” याबरोबरच या मुलाखतीमध्ये रणबीर कपूर किशोर कुमार यांच्यावरील बायोपिक विषयीही बोलला.

याविषयी रणबीर म्हणाला, “किशोर कुमार बायोपिक ज्यावर अनुराग बसू काम करत आहेत तयाबद्दल पण बऱ्याच गोष्टी कानावर येत आहेत. ह्या महिनाअखेरपर्यंत मी त्या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचेन, पण अद्याप मला कोणतीही कथा आवडलेली नाही किंवा मी कशालाही होकार दिलेला नाही.” याबरोबरच मध्यंतरी ‘रामायण’साठी रणबीरने त्याच्या बऱ्याच सवयी बदलल्याची चर्चा रंगली होती. यावरही त्याने स्पष्टीकरण दिलं आहे.

आणखी वाचा : पांढरा शर्ट, डोळ्यांवर चश्मा अन् हातात बंदूक; शाहिद कपूरच्या आगामी ‘देवा’मधील डॅशिंग लूक व्हायरल

रणबीर म्हणाला, “अॅनिमलच्या शेवटच्या सीनसाठी मी प्रथमच टक्कल केलं. सध्या तरी मी कोणत्याही चित्रपटावर काम करत नाहीये. त्यामुळे कोणतंही डाएट फॉलो न करता मला जे आवडेल पटेल ते मी खातोय. मी माझ्या जीवनशैलीत बरेच महत्त्वाचे बदल केले आहेत. मी धूम्रपान सोडलं आहे मी त्यासाठी मी सध्या भरपूर चॉकलेट खातोय.” सध्या रणबीर त्याच्या आगामी ‘अॅनिमल’च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहतोय. दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांचा हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader