Ranbir Kapoor With Daughter Raha : गेल्या कित्येक महिन्यांपासून रणबीर कपूर व आलिया भट्टचं वांद्रे येथील नव्या घराचं बांधकाम सुरू आहे. २५० कोटींचा खर्च करून रणबीर व आलिया हे नवं घर उभारत आहेत. त्यामुळे सतत दोघं आपल्या नव्या घराची पाहणी करताना दिसतात. आज (१८ ऑगस्ट) नव्या घराची पाहणी करण्यासाठी रणबीर आपल्या लाडक्या लेकीला घेऊन गेला होता. यासंबंधितचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

अभिनेता रणबीर कपूर ( Ranbir Kapoor ) व राहा कपूरचे व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर्सने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आज सकाळी रणबीर लेक राहाबरोबर नव्या घराची पाहणी करण्यासाठी पोहोचला होता. यावेळी रणबीर कूल लूकमध्ये पाहायला मिळाला. तर चिमुकली राहा स्टायलिश लूकमध्ये दिसली.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”

हेही वाचा – Video: “वाटाण्याचा गोल दाना…”, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकारांचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

राहाने डेनिम जीन्स शॉर्ट्स आणि टी-शर्ट घातलं होतं. तसंच तिच्या केसांचा छोटासा बो (Bow) घातला होता आणि त्याच्या बाजूला छोटेस हेअरपिन लावले होते. या लूकमध्ये राहा फारच गोड दिसत होती. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राहा बाबा रणबीरचा ( Ranbir Kapoor ) बोट पकडून चालताना दिसत आहे. राहाच्या या गोड अंदाजाने पुन्हा एकदा तिने सगळ्यांची मनं जिंकली आहेत.

हेही वाचा – Video: सुशांत सिंह राजपूतनंतर रिया चक्रवर्ती करोडपती निखिल कामथला करतेय डेट, बाईकवरचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले…

दरम्यान, रणबीर-आलियाचं २०२२मध्ये लग्न झालं होतं आणि त्यानंतर त्याचवर्षी ६ नोव्हेंबरला राहाचा जन्म झाला होता. दोघांनी एक वर्ष राहाचा चेहरा लपवला. गेल्या वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर रणबीर व आलियाने राहाची पहिली झलक दाखवली. तेव्हापासून राहाचे क्यूट व्हिडीओ नेहमी व्हायरल होतं असतात.

ही वाचा – Video: काळ्या रंगाच्या स्कर्ट-टॉपमध्ये ‘पारू’ फेम शरयू सोनावणेचा क्यूट अंदाज, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बार्बी डॉल”

रणबीर कपूरच्या ( Ranbir Kapoor ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो शेवटचा संदीप रेड्डी वांगाच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात झळकला होता. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात रणबीरचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता लवकरच त्याचा ‘रामायण’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटात अभिनेता प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री साई पल्लवी आणि लारा दत्ता झळकणार आहेत. सध्या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे.

Story img Loader