Animal Pre-teaser : अभिनेता रणबीर कपूरच्या ‘तू झुठी मैं मक्कार’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. लवकरच रणबीर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात रणबीर कपूरबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. गेले कित्येक दिवस प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असून प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवून आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काल घोषणा केल्याप्रमाणे या चित्रपटाचा ‘प्री-टीझर’ नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्री-टीझरमध्ये फारसं काही दाखवलं नसलं तरी रणबीरचा जबरदस्त अॅक्शन अंदाज यात आपल्याला बघायला मिळणार आहे. ११ जूनला बरोबर ११ वाजून ११ मिनिटांनी हा टीझर प्रदर्शित करण्यात आला.

आणखी वाचा : रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ हा केवळ प्रौढांसाठी; १८ वर्षांखालील मुलांना घ्यावी लागणार पालकांची लेखी परवानगी?

या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर कुऱ्हाडीने काही मुखवटा परिधान केलेल्या लोकांना मारत आहे. तो एकहाती कुऱ्हाडीने त्यांच्यावर वार करताना दिसत आहे. रणबीरने यामध्ये पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान केलं आहे. हा व्हिडीओ आणि यातील हिंसा पाहता रणबीर एका पॉवरफूल गँगस्टरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. रणबीर या लोकांना मारत असताना एक पंजाबी गाणंदेखील आपल्याला ऐकायला मिळत आहे.

एकूणच या टीझरमध्येच एवढी हिंसा पाहायला मिळत आहे तर संपूर्ण चित्रपटात नेमकं काय काय पाहायला मिळेल याची कल्पना न केलेलीच बरी. ‘अ‍ॅनिमल’हा चित्रपट ११ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम या पाच भाषांमध्ये हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होईल. रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’चित्रपटाबरोबर सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा ‘गदर २’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor starrer most awaited animal movie pre teaser released avn