रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाची आजही वेगवेगळ्या कारणांनी चर्चा होताना दिसते. डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या अ‍ॅनिमल या चित्रपटाने मोठा गल्ला जमवीत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता या चित्रपटातून डिलीट केलेल्या सीनमुळे ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील काढून टाकलेले सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे नेटकरी हे सीन बघितल्यानंतर आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत. हे सीन चित्रपटात का घेतले नाहीत, असा प्रश्न ते विचारताना दिसत आहेत.

समोर आलेला सीन हा विमानातील आहे. विमानात रणबीर कपूर आणि त्याचे साथीदार बसलेले दिसत आहेत. रणबीर कपूर अत्यंत मद्यधुंद अवस्थेत असून, पायलटकडे जातो आणि पायलटच्या खांद्यावर हात ठेवून त्याला उठण्याचा इशारा देतो. त्याचे सर्व साथीदार तो काय करीत आहे, याकडे आश्चर्यांने पाहत आहेत. पायलटला उठवून रणबीर त्याच्या जागी स्वत: विमान चालवतो. यावेळी रणबीरच्या तोंडात सिगारेट असून तो विमान चालवीत असल्याचे ते दृश्य आहे. या सीनच्या पार्श्वभूमीला पापा मेरी जान हे गाणे चालू असल्याचे दिसत आहे.

काय म्हणाले नेटकरी?

आता हे दृश्य पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने संदीप रेड्डी वंगा यांना टॅग करीत म्हटले आहे की, चित्रपटातून हे सीन डिलीट केल्याबद्दल मी तुम्हाला माफ करणार नाही. रणबीरने त्याच्या भावाला मारल्यानंतर त्याची शांतता आणि वेदना यातून स्पष्ट दिसत आहे. एका युजरने, “विमान उडतानाचे हे दृश्य चित्रपटाच्या कहाणीला वेगळ्या उंचीवर घेऊन जात आहे”, असे म्हटले आहे. एका युजरने म्हटले आहे की, स्वत: संदीप रेड्डी वंगा यांनी स्वत:च हा सीन चित्रपटात न घेतल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले होते की, त्यांना चित्रपटाचा वेळ ३.३० तास ठेवायचा होता. मात्र, नेटफ्लिक्सच्या पॉलिसीमुळे त्यांनी तो सीन कट केला.

हेही वाचा: “तुझ्या सगळ्या बिझनेसची…”, प्राजक्ता माळीच्या वाढदिवशी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरची खास पोस्ट

दरम्यान, संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची आजही चाहते आणि चित्रपटसृष्टीत मोठी चर्चा होताना दिसते. अनेकांनी या चित्रपटात दाखविलेल्या काही दृश्यांवर टीकादेखील केल्याचे पाहायला मिळाले होते. जावेद अख्तर यांनी या चित्रपटात ज्याप्रकारे महिलांना वागणूक दिली आहे. त्यावर ताशेरे ओढले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor starrer movie animal movie deleted scene viral on social media netizens reacts nsp