बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘लव्ह अँण्ड वॉर’ आणि ‘रामायण: भाग १’ या दोन्ही चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर लगेचच तो ‘धूम ४’ बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात रणबीर मुख्य भूमिका साकारणार आहे. अशात सध्या ‘धूम ४’ बहुचर्चित चित्रपटात त्याच्याबरोबर खलनायकाची भूमिका कोण साकारणार यावर चर्चा होतेय.

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘धूम ४’ चित्रपटाची स्टारकास्ट अद्याप पूर्ण झालेली नाही. निर्मात्यांकडून खलनायकाच्या भूमिकेसाठी दाक्षिणात्य कलाकाराचा शोध सुरू आहे. या चित्रपटात रणबीर दाक्षिणात्य खलनायकासह रुपेरी पडद्यावर झळकावा यासाठी निर्माते प्रयत्न करत आहेत.

tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Tula Shikvin Changalach Dhada Promo
अक्षराच्या माहेरी पोहोचली भुवनेश्वरी! अधिपतीला फोन केला अन् सुनेला दिलं खुलं आव्हान…; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
Paaru
Video: संक्रातीच्या मुहुर्तावर सारंग-सावलीचे नाते फुलणार तर पारूवर येणार नवीन संकट, पाहा प्रोमो
veer pahariya varun dhawan body double bhediya
वरुण धवनच्या ‘या’ सिनेमात बॉडी डबल म्हणून केलं काम, आता मुख्य भूमिकेत पदार्पण करणार ‘हा’ अभिनेता
Swapnil Joshi and Prasad Oak opinion that story is important actors are secondary at Jilbi trailer launch
“कथा मुख्य, कलाकार दुय्यम”, ‘जिलबी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान अभिनेते स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांचे मत
Who are you to stop construction of Sambhaji Maharajs statue says Shivendrasinh Raje
संभाजी महाराजांचा पुतळा उभारणी रोखणारे तुम्ही कोण- शिवेंद्रसिंहराजे
Paaru
Video: पारूचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पद आदित्य वाचवू शकणार का? मालिकेत पुढे काय घडणार? पाहा प्रोमो

हेही वाचा : तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो

त्यामुळे रणबीर कपूरबरोबर ‘धूम ४’ चित्रपटात कोणता दाक्षिणात्य अभिनेता खलनायक म्हणून दिसणार यावरही चर्चा होत आहे. यात अनेक प्रसिद्ध दाक्षिणात्य कलाकारांची नावे घेतली जात आहेत. मात्र, अद्याप येथे कुणाची वर्णी लागणार हे स्पष्ट झालेलं नाही.

‘धूम’ चित्रपटाच्या या सीरिजमधील प्रत्येक चित्रपट तुफान गाजला आहे. ‘धूम’ चित्रपटात खलनायक म्हणून जॉन अब्राहम झळकला होता. त्यानंतर ‘धूम २’ मध्ये हृतिक रोशनने जबदस्त अभिनय केला. तसेच ‘धूम ३’ मध्ये बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान चोराची भूमिका साकारताना दिसला. त्यामुळे ‘धूम ४’ मध्ये खलनायकाची भूमिका कोणता अभिनेता साकारणार हे जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.

हेही वाचा : “माझ्या वडिलांचा विरोध…”, सोनाली अन् अभिषेक गावकरने सांगितला लव्ह स्टोरीचा रंजक किस्सा

दरम्यान, रणबीरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास सध्या तो संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँण्ड वॉर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासह आलिया भट्ट आणि विकी कौशलसुद्धा स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यांचा हा चित्रपट मार्च २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटाचा भाग १ पुढल्या वर्षी २०२६ मध्ये दिवाळीत प्रदर्शित होईल, तर दुसरा भाग २०२७ मध्ये दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.

‘धूम ४’ या चित्रपटातून रणबीर कपूरचा आतापर्यंतचा वेगळा आणि खास लूक पाहायला मिळणार आहे. २०२५ मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होण्याची शक्यता आहे.

Story img Loader