रणबीर कपूर बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. कपूर घराण्यात जन्मलेल्या रणबीरने एक सो एक हिट चित्रपटातून प्रेक्षकांवर अभिनयाची छाप पाडली. रणबीर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सध्या रणबीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन रणबीर कपूरचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूरचा चाहत्या त्याच्याबरोबर सेल्फी घेताना दिसत आहे. पण काहीतरी कारणास्तव फोटो येत नसल्यामुळे तो पुन्हा सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्यानंतर रणबीरने चाहत्याच्या हातातून मोबाईल घेऊन फेकून दिल्याचं दिसत आहे. रणबीरचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा>> २०० कोटींच्या घोटाळा प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला पटियाला कोर्टाकडून मोठा दिलासा; दिला ‘हा’ निर्णय

रणबीरच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी कमेंट करत हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं आहे. तर कित्येकांनी ही जाहिरात असल्याचंही म्हटलं आहे. काहींनी या व्हिडीओवर कमेंट करत रणबीरला ट्रोल केलं आहे. “नेमकं काय झालं असेल?”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “संजय दत्तची भूमिका साकारल्यानंतर रणबीर कपूर”, असं म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने “अजून बना याचे चाहते”, अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा>> Video: हातात दारुचा ग्लास अन् कंगना रणौतचा डान्स; पार्टीतील व्हिडीओमुळे अभिनेत्री ट्रोल, नेटकरी म्हणाले “हिंदू धर्म…”

दरम्यान, रणबीर कपूर काही महिन्यांपूर्वीच बाबा झाला आहे. २०२२च्या एप्रिल महिन्यात त्याने अभिनेत्री आलिया भट्टशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात त्यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली. लेकीचं नाव ‘राहा’ असं आलिया-रणबीरने ठेवलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor throw fans phone away video goes viral kak