रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना बॉलीवूडची बेस्ट जोडी म्हटले जाते. रणबीर नेहमीच आलियाची काळजी घेताना दिसून येतो, तर आलियाही रणबीरचे कौतुक करण्याची एकही संधी सोडत नाही. दरम्यान रणबीर आणि आलियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरुन नेटकऱ्यांनी रणबीरला चांगलच ट्रोल केलं आहे. पामेला चोप्रांच्या निधनानंतर रणबीर आणि आलिया आदित्य चोप्रा भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले होते. त्यावेळेसचा दोघांचा व्हिडिओ समोर आला आहे.
हेही वाचा- Video: “बस झालं आता…”; पापाराझींवर पुन्हा भडकल्या जया बच्चन, म्हणाल्या, “माझ्यापासून..”
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट शुक्रवारी संध्याकाळी उशिरा आदित्य चोप्राच्या घरी पोहोचले. घरात प्रवेश करण्यापूर्वी आलियाने दाराच्या पायरीवरच चप्पल काढली आणि पुढे गेली, मागून येणाऱ्या रणबीरने आलियाची चप्पल उचलली आणि आत बाजूला ठेवली. रणबीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावेळी दोघेही अतिशय कॅज्युअल लूकमध्ये दिसले. आलियाने पांढरा लखनवी कुर्ता तर रणबीर पांढऱ्या टी-शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये दिसला.
हा व्हिडिओ बघून काही यूजर्स रणबीरचे कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर रणबीर-आलियाचे सर्वोत्कृष्ट कपल म्हणून वर्णन केले जात आहे. एका यूजरने लिहिले की, ‘पुरुष फक्त त्याच्या आवडीच्या महिलेची चप्पल उचलतो.’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘रणबीरने ज्या पद्धतीने आलियाची चप्पल उचलली!’ तर तिसऱ्या यूजरने लिहिले, ‘यार द्वेष पसरवणे बंद करा, तो तिची किती काळजी घेत आहे. तर दुसरीकडे नेटकरी रणबीरला ट्रोल करताना दिसत आहेत. काही वापरकर्ते रणबीरच्या कृतीला मुर्खपणा म्हणत आहेत. चप्पल घालून आत गेल्यावरुन ट्रोल करत आहेत तर काही जण त्याला ओव्हर अॅक्टिंगची दुकान म्हणत आहेत.

काही युजर्स रणबीर कपूरबद्दल मजेशीर कमेंटही करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे- ‘भाऊ, चप्पल चोरीला गेली तर नवऱ्याचेच नुकसान होईल, तो हुशार आहे’, एका यूजरने लिहिले आहे ‘अरे, चप्पल चोरीला गेली तर.
रणबीर कपूर आणि आलिया यांच्या लग्नाला १ वर्ष झाले आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेंकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांनी १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न केले. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी आलिया आणि रणबीरची मुलगी राहाचा जन्म झाला. रणबीर आलियाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर लवकरच रणबीर ‘अॅनिमल’ या चित्रपटात दिसणार आहे. तर आलिया सध्या करण जोहरचा चित्रपट रॉकी आणि राणीच्या प्रेमकथेमध्ये व्यस्त आहे.