गेल्या काही वर्षांमध्ये बॉलीवूडमध्ये अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपट प्रदर्शित झाले. यातील काही चित्रपटांना प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला तर काहींकडे पाठ फिरवली. ‘आदिपुरुष’नंतर आता दिग्दर्शक नितेश तिवारी आता करत असलेल्या ‘रामायण’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत तर ‘केजीएफ’स्टार यश हा ‘रावण’ म्हणून दिसणार आहे.

या चित्रपटात आधी सीतेच्या भूमिकेत आलिया भट्टसुद्धा दिसणार होती, पण काही कारणास्तव तिने या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. रणबीर कपूर या चित्रपटासाठी चांगलीच मेहनत घेत आहे, इतकंच नव्हे तर तो यासाठी मांसाहार व मद्यपानही बंद करणार असल्याची चर्चा आहे. आता या चित्रपटाशी निगडीत एक नवा अपडेट समोर येत आहे.

Vishwa Hindu Parishad on temple and mosque row
“…म्हणून मशिदीच्या जागेवरील दावे वाढत आहेत”, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यानं सांगितलं कारण
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
dhananjay munde valmik karad santosh deshmukh murder
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”

आणखी वाचा : इस्रायलमधून सुखरूप परतलेल्या नुसरत भरूचाने मानले पंतप्रधान मोदी व भारत सरकारचे आभार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

‘पिंकव्हीला’च्या रीपोर्टनुसार या चित्रपटात सनी देओलची एंट्री होणार आहे. सनी या चित्रपटात हनुमानाच्या भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘पिंकव्हीला’च्या खात्रीशीर सूत्रांच्या माहितीनुसार हनुमान ही शक्तिचं प्रतीक आहे आणि या भूमिकेसाठी सनी देओलहून उत्कृष्ट अभिनेता मिळणं कठीण आहे असं त्यांचं म्हणणं आहे.

मध्यंतरी सनीने ‘रामायण’शी निगडीत चित्रपटात काम करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. सध्या निर्माते व सनी देओल यांच्यात चर्चा सुरू आहे आणि त्यातून सकारात्मक निर्णय समोर येईल अशी आशा आहे. इतकंच नव्हे तर दिग्दर्शक नितेश तिवारी ही बजरंगी बलीवर एक स्वतंत्र चित्रपटही काढू इच्छित आहेत. प्रेक्षक या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे.

Story img Loader