रणबीर कपूरने संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या टीझरमध्ये रुद्रावतार धारण करत सोशल मीडियावर तुफान लोकप्रियता मिळवली आहे. बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी यांच्या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला. प्रेक्षकांनी याला उत्तम प्रतिसाद दिला आहे. सिनेरसिक व रणबीरचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.

एक गोष्ट मात्र फार कमी लोकांना ठाऊक आहे या चित्रपटासाठी रणबीर कपूर हा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांची पहिली पसंती नव्हता. आधी या भूमिकेसाठी एका दाक्षिणात्य स्टारचा विचार संदीप यांनी केला होता. मीडिया रीपोर्टनुसार ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट सर्वप्रथम दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याला ऑफर झाला होता.

sequel of Ghajini film Allu Arvind Aamir khan
‘गजनी’चा सिक्वेल येणार ? ‘तंडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच निमित्ताने अल्लू अरविंद आणि आमिर यांची भेट; महत्वाची अपडेट आली समोर. . .
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Pratik Gandhi recalls his first kissing scene with senior actor Vidya Balan
विद्या बालनबरोबर केला पहिला किसिंग सीन, बॉलीवूड अभिनेता अनुभव सांगत म्हणाला, “ती खूप…”
Junaid khan says he releasing film on youtube is best
थिएटर व OTT च्या वादावर आमिर खानचा मुलगा म्हणाला, “चित्रपट युट्यूबवर मोफत…”
anshuman vichare enters in star pravah serial
Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकलेला ‘हा’ अभिनेता ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत येणार! प्रोमोत दिसली झलक
kiran mane shares post for maharashtrachi hasya jatra fame rohit mane
आमचा चित्रपट येतोय…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील ‘या’ अभिनेत्यासाठी किरण मानेंची पोस्ट, सांगितला खास अनुभव
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”
jackie shroff marathi movie
जॅकी श्रॉफ तब्बल १० वर्षांनी दिसणार मराठी सिनेमात, सोबतीला ‘हा’ मराठमोळा अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

आणखी वाचा : १३ वर्षांपूर्वी शाहरुखसह विशाल भारद्वाज बनवणार होते ‘हा’ चित्रपट, चित्रीकरणही सुरू होणार होतं, पण…

सर्वप्रथम संदीप हा चित्रपट तेलुगू भाषेतच बनवणार होते. महेश बाबूने ही भूमिका करायला नकार दिल्याने संदीप रेड्डी वांगा ती घेऊन रणबीरकडे गेले अन् मग हा चित्रपट हिंदीत करायचं नक्की झालं. महेश बाबूच्यामते त्याच्या चाहत्यांसाठी व प्रेक्षकांसाठी हा खूप डार्क चित्रपट आहे आणि त्यांना तो झेपणार नाही म्हणूनच त्याने ही भूमिका नाकारली.

संदीप रेड्डी वांगा आणि महेश बाबू यांनी एका जाहिरातीसाठी एकत्र काम केलं होतं. त्यावेळीच त्यांनी महेश बाबूसह काम करायचं ठरवलं होतं. एका मुलाखतीमध्ये संदीप यांनी सांगितल्याप्रमाणे ‘अ‍ॅनिमल’ हा आजवरचा सर्वात हिंस्त्र चित्रपट असणार आहे. या चित्रपटासाठी रणबीर कपूरने ७० कोटी इतकं मानधन आकारल्याचीही चर्चा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Story img Loader