संदीप वांगा रेड्डीने दिग्दर्शित केलेला Animal हा सिनेमा अजूनही चर्चेत आहे. या सिनेमाने छप्परफाड कमाई केली. अनेकांनी या सिनेमावर टीकाही केली तर काही जणांनी या सिनेमाची स्तुती केली. सिनेमाने कोट्यवधी रुपये कमवले आहेत. सिनेमात अॅक्शन सीन आणि इंटिमेट सीनही आहेत. रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या इंटीमेट सीनची चर्चाही झाली. या इंटीमेट सीनसाठी आलिया भटने परवानगी दिली होती का? यावर रणबीर कपूरने उत्तर दिलं आहे.
अॅनिमल सिनेमात रणबीर कपूर, रश्मिका मुख्य भूमिकेत
अॅनिमल या सिनेमात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरी यांच्या भूमिका आहेत. तृप्ती डिमरी आणि रणबीर कपूर या दोघांचे इंटीमेट सीन चर्चेत आले होते. भाभी २ हे सिनेमातलं तिचं नाव ट्रेंडमध्येही आलं होतं. या सीनच्या चित्रिकरणाच्या वेळी पाचच लोक उपस्थित होते. मात्र रणबीरने याबाबत जे भाष्य केलं आहे त्यामुळे या सीनची आणि सिनेमाची आठवण अनेकांना झाली आहे.
त्या सीनसाठी आलियाची परवानगी होती का?
तृप्ती डिमरीबरोबरच्या सीनसाठी आलियाची परवानगी घेतली होती का? यावर रणबीर कपूर म्हणाला, “मी खरंतर हा सीन करताना थोडा घाबरलो होतो. पण आलियाने पत्नी म्हणून मला सपोर्ट केला. आम्ही दोघंही एकमेकांच्या कामाबाबत एकमेकांना कायमच सहकार्य करत असतो. अॅनिमलच्या शूटिंग दरम्यान तृप्ती डिमरीसह इंटीमेट सीनबाबत मी सांगितलं होतं. त्यावर आलियाने मला परवानगी तर दिलीच शिवाय मला तिने पूर्ण पाठिंबाही दिला. त्यामुळेच मला हा सीन करताना मदत झाली.” असं उत्तर रणबीर कपूरने एका मुलाखतीत विचारल्यानंतर सांगितलं आहे.
हे पण वाचा- Javed Akhtar on Animal Movie: “जर हे चित्रपट हिट होत असतील…”, गीतकार जावेद अख्तर यांचे वक्तव्य
रणबीर पुढे बोलताना म्हणाला की, अॅनिमलमधील सीनसाठी आणि खासकरुन मला तयार करण्यासाठी आलियाने माझी मदत केली. आलिया मला म्हणाली की, “ही एक भूमिका आहे. इंटीमेट सीन याचाच भाग आहेत.” हा सिनेमा करण्यासाठी आलीयाने माझी मोठी मदत केली.
तृप्ती डिमरीला अॅनिमल या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. अॅनिमल हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटामधील तृप्ती आणि रणबीरच्या इंटिमेट सीन्सची चर्चा सोशल मीडियावर झाली. याबाबत बोलताना तृप्ती डिमरी म्हणाली होती की, “मला हा सीन शूट करताना रणबीर कपूरची मोठी मदत झाली. सीन शूट करताना त्याने माझी काळजी घेतली.”