बॉलीवूडचा चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे रणबीर कपूर. रणबीर आपल्या अभिनयाबरोबच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो. दरम्यान, रणबीरबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. ॲनिमल चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर रणबीर चित्रपटांतून सहा महिन्यांचा ब्रेक घेणार आहे. नुकत्याच एका मुलाखतीत रणबीरने याबाबत माहिती दिली.

हेही वाचा- आयराच्या लग्नानंतर आमिर खान देणार भव्य रिसेप्शन; कधी, कुठे? घ्या जाणून

chhagan bhujbal meets devendra fadnavis
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीसांना भेटून आल्यावर भुजबळ म्हणतात, “मी त्यांना सगळं सांगितलं आहे, त्यांनी ८-१० दिवस…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Chandrakant Patil On Pune Guardian Minister
Chandrakant Patil : पुण्याचं पालकमंत्रिपद मिळालं तर स्वीकारणार का? चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “माझं नेतृत्व मला…”
tharla tar mag can arjun sayali meets again madhubhau took strict decision
ठरलं तर मग : सायली-अर्जुनचं नातं कायमचं तुटणार? मधुभाऊंनी लेकीकडून घेतलं ‘हे’ वचन, तर दारात आलेला अर्जुन…; पाहा प्रोमो
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
Shabana Azmi
शबाना आझमी व जावेद अख्तर यांनी नाते संपवण्याचा घेतलेला निर्णय; खुलासा करीत म्हणाल्या, “आम्ही तीन महिने…”
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”

रणबीरने नुकतंच झूमला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या करिअरबाबत मोठी घोषणा केली आहे. रणबीर म्हणाला, “राहाच्या जन्मानंतर सुरुवातीचे काही महिने मी तिला वेळ देऊ शकलो नव्हतो, कारण मी शूटिंगमध्ये व्यस्त होतो. आता मी चित्रपटांमधून सहा महिन्यांचा ब्रेक घेणार आहे. ब्रेक घेऊन मी माझी मुलगी राहाबरोबर वेळ घालवणार आहे. राहा आता हळू हळू रांगायला लागली आहे. आता ती वस्तूंना ओळखते. आता ती बोलायलाही शिकत आहे. हळूहळू ती मॉं आणि पा बोलण्याचा प्रयत्न करत आहे.”

हेही वाचा- कंगना रणौतने केलं रावण दहन, ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला मिळाला मान; अध्यक्षांनी सांगितलं निवडीचं कारण

रणबीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच त्याचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या टीझरमध्ये रणबीरचा रुद्र अवतार दाखवण्यात आला होता. या चित्रपटात रणबीरबरोबर बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरी यांची प्रमुख भूमिका आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटामध्ये रणबीर कपूर श्रीरामाची भूमिका साकारणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.

Story img Loader