Animal Box Office Collection Day 4: रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांबाहेर गर्दी करत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जगभरात १०० कोटींचा तर दुसऱ्या दिवशी २०० कोटींचा टप्पा ओलांडला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी या चित्रपटाने सर्व भाषांमध्ये ७२.५० कोटींची कमाई केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यापैकी ६४.८० कोटींची कमाई या चित्रपटाने हिंदी भाषेतून केली. आता हा चित्रपट इंडस्ट्रीच्या ‘मंडे टेस्ट’मध्ये पास होणार की नाही यावरुन चांगलीच चर्चा रंगली होती. नुकतंच या चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत अन् हा चित्रपट ‘मंडे टेस्ट’मध्ये पास झाल्याचं समोर येत आहे. पहिल्या चार दिवसांत या चित्रपटाची भारतातील कमाई २४० कोटींच्या पार गेली.

आणखी वाचा : ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीरसह इंटीमेट सीन देणारी तृप्ती डिमरी रातोरात बनली नॅशनल क्रश; जाणून घ्या अभिनेत्रीचा प्रवास

आता सोमवारचे कलेक्शन पाहता लवकरच रणबीरचा ‘अ‍ॅनिमल’ ३०० कोटींचा टप्पाही पार करेल असं चित्र पाहायला मिळत आहे. इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’च्या रीपोर्टनुसार चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ३९.९ कोटींची कमाई केल्याचं सांगितलं जात आहे. हे आकडे पाहता चित्रपट सोमवारच्या टेस्टमध्ये उत्तीर्ण झाल्याचं कित्येक ट्रेड एक्स्पर्टचं मत आहे.

‘अ‍ॅनिमल’मधील रणबीर कपूरच्या कामाचं प्रचंड कौतुक होत आहे, शिवाय बॉबी देओललाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. चित्रपटातील बरेच वादग्रस्त मुद्दे चर्चेचा विषय ठरत असल्याने या चित्रपटाबद्दल दोन टोकाचे मतप्रवाहदेखील पाहायला मिळत आहेत. ट्रेड एक्स्पर्टच्या म्हणण्यानुसार जवळपास १०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात आत्तापर्यंत ३५६ कोटींचा व्यवसाय केला आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीरसह रश्मिका मंदान्ना, तृप्ती डीमरी, अनिल कपूर, बॉबी देओल शक्ति कपूर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoors animal box office collection day 4 sets to cross 300 crore mark avn