Animal Box Office Collection Day 5: रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांबाहेर गर्दी करत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जगभरात १०० कोटींचा तर दुसऱ्या दिवशी २०० कोटींचा टप्पा ओलांडला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी या चित्रपटाने सर्व भाषांमध्ये ७२.५० कोटींची कमाई केली.

चित्रपटाची अशीच यशस्वी घोडदौड बॉक्स ऑफिसवर सुरू असून चार दिवसात या चित्रपटाने जगभरात ४०० कोटींचा टप्पा पार केला आहे. इतकंच नव्हे तर हा चित्रपट ‘मंडे टेस्ट’मध्ये पास झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सोमवारी ५० कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने पुढच्या दिवशी म्हणजेच मंगळवारीही अशीच जबरदस्त कमाई केली आहे. इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार पाचव्या दिवशी रणबीरच्या या चित्रपटाने ३८ कोटींची कमाई केली आहे.

suraj chavan
ठरलं! सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपूक’ चित्रपट ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
sequel of Ghajini film Allu Arvind Aamir khan
‘गजनी’चा सिक्वेल येणार ? ‘तंडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच निमित्ताने अल्लू अरविंद आणि आमिर यांची भेट; महत्वाची अपडेट आली समोर. . .
Junaid khan says he releasing film on youtube is best
थिएटर व OTT च्या वादावर आमिर खानचा मुलगा म्हणाला, “चित्रपट युट्यूबवर मोफत…”
Urvashi Rautela
उर्वशी रौतेलाने ट्रोल करणाऱ्यांना दिलं उत्तर; म्हणाली, “लोक सलमान खान आणि शाहरूख खानला सोडत नाहीत तर…”
Fussclass Dabhade Box Office Collection
हेमंत ढोमेच्या ‘फसक्लास दाभाडे’ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात! ३ दिवसांत कमावले तब्बल…; म्हणाला, “तिकीटबारीवर…”
marathi actor shares his opinion on chhaava movie
“लहान तोंडी मोठा घास, पण…”, ‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत; विकी कौशलबद्दल म्हणाला…
vaastav 2 sanjay dutt mahesh manjrekar
महेश मांजरेकरांच्या ‘वास्तव’चा २६ वर्षांनी येणार सिक्वेल? संजय दत्त सिनेमात दिसणार की नाही? वाचा…

आणखी वाचा : ‘अ‍ॅनिमल’ पाहिल्यावर अशी होती बॉबी देओलच्या आईची, पत्नीची व मुलांची प्रतिक्रिया; अभिनेत्यानेच केला खुलासा

पाच दिवसांत ‘अ‍ॅनिमल’ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’चाही हा चित्रपट लवकरच रेकॉर्ड मोडणार आहे. पाच दिवसात ‘अ‍ॅनिमल’ने भारतात २३८ कोटींची तर जगभरात ४८१ कोटींची कमाई केली आहे. ‘अ‍ॅनिमल’ हा कमाईच्या बाबतीत ‘संजू’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या दोन्ही चित्रपटांना मागे टाकेल असं सांगितलं जात आहे.

रणबीरच्या करिअरमधील हा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘जवान’ आणि ‘पठाण’ या शाहरुख खानच्या दोन्ही चित्रपटांनी मिळून २२०० कोटींची कमाई केली होती, तेवढी कमाई ‘अ‍ॅनिमल’ला करणं शक्य नाही, परंतु यापैकी एका चित्रपटाचा ‘अ‍ॅनिमल’ नक्कीच रेकॉर्ड मोडू शकतो. ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीरसह रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, बॉबी देओल, शक्ति कपूर, तृप्ती डिमरी हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत.

Story img Loader