बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये रणबीरचे हिंस्त्र रुप बघायला मिळाले. भरपूर ॲक्शनने भरलेल्या या टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. याबरोबरच यातील गाणीही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. भारताबरोबर परदेशातही या चित्रपटाची क्रेझ बघायला मिळत आहे.
बॉक्स ऑफिसवर तर फक्त ‘अॅनिमल’चाच डंका वाजताना दिसत आहे. ज्या पद्धतीने रणबीरच्या चित्रपटासाठी एडवांस बुकिंग ते पाहता हा चित्रपट पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई करणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. इतकंच नव्हे तर ‘अॅनिमल’ हा रणबीरच्या करिअरमधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरू शकतो असंही काही ट्रेड एक्स्पर्टनी सांगितलं आहे.
आणखी वाचा : “हे माझं सर्वात वाईट काम कारण…” ‘रमण राघव २.०’बद्दल विकी कौशलचं वक्तव्य चर्चेत
‘सॅकनिल्क’च्या रीपोर्टनुसार ‘अॅनिमल’ची सोमवार सकाळपर्यंत २ लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. याचा अर्थ प्रदर्शनाच्या चार दिवस आधीच रणबीरच्या चित्रपटाने जवळपास ७ कोटींची कमाई केली आहे. सोमवारपासूनच याच्या तिकीट बुकिंगमध्ये प्रचंड वाढ पाहायला मिळाली असल्याचं मीडिया रीपोर्टनुसार स्पष्ट झालं आहे. ‘कबीर सिंग’सारखा चित्रपट दिल्यानंतर संदीप रेड्डी वांगा एक आणखी वेगळा प्रयोग प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत.
एकंदर आकडे व मीडिया रीपोर्टनुसार ‘अॅनिमल’ पहिल्या दिवशी ४० कोटींची कमाई सहज करेल अशी शक्यता आहे. गेल्यावर्षी आलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ने ३६ कोटींची कमाई पहिल्या दिवशी केली होती तर २०१८ साली आलेल्या ‘संजू’ने ३४.७५ कोटींची कमाई पहिल्या दिवशी केली होती. ‘अॅनिमल’मध्ये रणबीर कपूरसह रश्मिका मंदाना, अनिल कपूर, शक्ति कपूर, बॉबी देओल, तृप्ती दीमरी हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट मिळालं असून या चित्रपटाची लांबी ३ तास २१ मिनिटे आहे.