Animal Trailer: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये रणबीरचे हिंस्त्र रुप बघायला मिळाले. भरपूर ॲक्शनने भरलेल्या या टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. याबरोबरच यातील गाणीही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. भारताबरोबर परदेशातही या चित्रपटाची क्रेझ बघायला मिळत आहे.
याच्या टीझरपासूनच या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. अखेर प्रतीक्षा संपली आहे. रणबीर कपूरच्या या बहुचर्चित ‘अॅनिमल’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे अन् दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी सांगितल्याप्रमाणेच हा ट्रेलरसुद्धा हिंसा आणि रक्तपात याने भरलेला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच रणबीर कपूर व अनिल कपूर या वडील-मुलामधील एका वेगळ्याच अन् विचित्र नात्याची आपल्याला झलक पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : सेन्सॉरकडून ‘A’ सर्टिफिकेट तर चित्रपटाची लांबी तीन तास… ‘अॅनिमल’बद्दल संदीप रेड्डी वांगा यांचं ट्वीट चर्चेत
आपल्या वडिलांनाच आपला आदर्श मानणारा, त्यांच्यासाठी कोणत्याही थराला जाणारा एका गुन्हेगार मुलांचं त्याच्या वडिलांशी असलेलं नातं हे या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आलं असणार अशी शक्यता ट्रेलरवरुन वर्तवली जात आहे. याबरोबरच या कुटुंबाचा गुन्हेगारी विश्वाशी काहीतरी कनेक्शन असल्याचंही ट्रेलरवरुन स्पष्ट होत आहे. चित्रपटात या नात्याबरोबरच जबरदस्त अॅक्शन आणि प्रचंड हाणामारी आणि हिंसा पाहायला मिळणार असल्याची झलक ट्रेलरमध्येच दिसली आहे. चित्रपटात रश्मिका मंदानाचं पात्रदेखील फार महत्त्वाचं ठरणार असल्याचं दिसत आहे.
“अब एक और खरोच आयी तो दुनिया जला दुंगा” असं आपल्या वडिलांसमोर सांगणाऱ्या रणबीरचं हे हिंस्र रूप व डॅशिंग अंदाज प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. चित्रपटातील बॉबी देओलचे पात्र हेदेखील रणबीरप्रमाणेच हिंसक दाखवले असल्याचं ट्रेलरमधून स्पष्ट होत आहे. बॉबी व रणबीरमधील जबरदस्त अॅक्शन सीन ट्रेलरच्या शेवटाकडे पाहायला मिळत आहे. बॉबीचे पात्रं मुकं असणार असल्याची चर्चा आहे, शिवाय ट्रेलरमध्ये बॉबीच्या तोंडी एकही संवाद नसल्याने ही शक्यता नाकारता येत नाही. एकूणच संदीप रेड्डी वांगा यांनी सांगितल्याप्रमाणे हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणेच फार हिंसक असणार हे या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरवरुन स्पष्ट होत आहे.
या चित्रपटाला सेन्सॉरकडून ‘ए’ सर्टिफिकेट मिळालं असून चित्रपटाची लांबी ही ३ तास २१ मिनिटं अशी असल्याचं खुद्द संदीप रेड्डी वांगा यांनीच स्पष्ट केलं आहे. रणबीरचा हा सगळ्यात वेगळा अवतार मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत. या ट्रेलरलाही लोकांनी पसंत केलं आहे. १ डिसेंबरला हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम अशा ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी विकी कौशलचा ‘सॅम बहादुर’सुद्धा प्रदर्शित होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर एक जबरदस्त टक्कर पाहायला मिळणर आहे.