अभिनेत्री अमिषा पटेल अडचणीत सापडली आहे. तिच्याविरोधात न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे. झारखंडमधील रांची दिवाणी न्यायालयाने अमिषा पटेल आणि तिचा व्यावसायिक भागीदार क्रुणाल यांच्याविरुद्ध फसवणूक आणि चेक बाऊन्स प्रकरणात वॉरंट जारी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, अरगोरा येथील रहिवासी अजय कुमार सिंह यांनी २०१८ मध्ये अभिनेत्रीवर गुन्हा दाखल केला होता. तक्रारीतील आरोपानुसार, अमिषा पटेलने चित्रपट बनवण्याच्या नावाखाली त्याच्याकडून अडीच कोटी रुपये घेतले होते, पण हा चित्रपट बनू शकला नाही आणि अमिषाने पैसेही परत केले नाहीत.

भर कार्यक्रमात पालकांचा दत्तक मुलगा असल्याचं कळालं अन्…; ‘Indian Idol’चा विजेता म्हणाला, “आयुष्यातील हे वास्तव…”

अजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, अमिषा पटेल आणि तिचा भागीदार क्रुणालने चित्रपट पूर्ण झाल्यानंतर व्याजासह पैसे परत करणार असल्याचे सांगितले होते. ‘देसी मॅजिक’ नावाच्या चित्रपटाचे शूटिंग २०१३ मध्ये सुरू झाले होते. मात्र, हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. तसेच चित्रपट निर्मात्याने अमिषा पटेलकडे पैसे मागितल्यावर तिने परत केले नाहीत. नंतर तिने ऑक्टोबर २०१८ मध्ये त्याला २.५ कोटी आणि ५० लाख रुपयांचे दोन चेक दिले होते, पण ते बाऊन्स झाले होते.

आकांक्षा दुबेने आत्महत्येपूर्वी केलेली ब्रेकअप पार्टी, खर्च केलेले इतके रुपये; वकिलाचा दावा

या प्रकरणी रांचीच्या दिवाणी न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे. अमिषाला समन्स बजावण्यात आले होते, पण तरीही ती कोर्टात हजर राहत नाही, तसेच ती तिचा वकीलही पाठवत नाही. अशा स्थितीत अमिषा पटेलविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. पुढील सुनावणी १५ एप्रिल रोजी होणार आहे. चेक बाऊन्स, फसवणूक आणि धमकावणे या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. तक्रारकर्ते अजय कुमार सिंह हे झारखंडमधील चित्रपट निर्माता आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranchi court issues warrant against actress ameesha patel in cheque bounce case hrc
Show comments