अभिनेता रणदीप हुडाने ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटात विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारण्यासाठी तब्बल २६ किलो वजन कमी केलं होतं. शूटिंग संपेपर्यंत ४ महिने तो फक्त एक खजूर आणि एक ग्लास दूध प्यायचा, असा दावा चित्रपट निर्माते आनंद पंडित यांनी केला होता. पण या दाव्यामागचं सत्य आता रणदीपने स्वतःच सांगितलं आहे.

“त्याला अभिनयाचा अ देखील येत नाही आणि तो…”, ‘गदर २’ चा ट्रेलर पाहून अभिनेत्याने उडवली खिल्ली

‘आज तक’शी बोलताना रणदीप म्हणाला, “ती बातमी खोटी आहे. मला तुमच्या मार्फत योग्य माहिती द्यायची होती. अनेकांना वजन कमी करण्याची घाई असते. मला भीती वाटते की अशा बातम्या वाचून लोक तसंच करू लागतील. मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी दूध आणि खजूरच्या डाएटवर नव्हतो. हे खूप धोकादायक आहे, यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. हे अजिबात फॉलो करू नका.”

Video: केसात गजरा अन् लाल रंगाची साडी नेसून ट्रॅफिक सिग्नलवर मागतोय पैसे, ‘या’ अभिनेत्याला ओळखलंत का?

रणदीप पुढे म्हणाला, “मी या भूमिकेसाठी २६ किलो वजन कमी केलं होतं हे खरं आहे. पहिली गोष्ट म्हणजे सामान्य लोकांना इतके वजन कमी करण्याची गरज नाही. आमच्यासारख्या अभिनेत्यांना अशी तयारी करावी लागते. माझ्याबाबतीत असंही झालं होतं की, माझा जो चित्रपट तीन-चार महिन्यांत तयार व्हायला हवा होता, तो बनायला एक वर्षाहून अधिक कालावधी लागला. या चित्रपटाच्या प्रदीर्घ शेड्यूलमुळे मला जवळपास ७ महिने कमी वजनात राहावे लागले. त्या काळात माझे वजन ६२ किलो असेल. एवढ्या कमी वजनामुळे मला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रिकव्हरीत अडचणी येत आहेत. शिवाय सांधेदुखी आणि पचनाच्या समस्या होऊ लागल्या. त्यामुळे अशा डाएटचा सल्ला मी कुणालाही देणार नाही.”

“भारत-पाकिस्तानमधील द्वेषाचं कारण…”, गदर २ च्या ट्रेलर लाँचवेळी सनी देओलचे वक्तव्य

रणदीप पुढे म्हणाला, “मी वेगवेगळे डाएट फॉलो केले. माझी बहीण डॉ. अंजली हुड्डा इंटर्नल मेडिसीन स्पेशालिस्ट आहे. ती मला डाएटबद्दल सल्ला देत असते. तिचा सल्ला घेऊनही मला इतका त्रास सहन करावा लागला. मी तज्ज्ञांनी सुचवलेले व्यायाम आणि डाएट फॉलो केले. त्यामुळे तुम्ही कोणत्याही तज्ज्ञाच्या मदतीशिवाय अशा गोष्टींमध्ये पडू नका, असा सल्ला मी देईन. तुम्ही सकस आहार घ्या, पण मी कोणालाही या टोकाच्या पातळीवर जाऊन डाएट फॉलो करण्याचा सल्ला देणार नाही.”

रणदीपने त्याच्या डाएटबद्दलही खुलासा केला. “या काळात मी पॅलेओ डाएट, इंटरमिटेंट फास्टिंग, व्हिटॅमिन सप्लिमेंट्सचे पालन केले. कारण मला पाच दिवसांत ६ ते ७ किलो वजन कमी करावे लागले. मी या सर्व प्रक्रियेतून तज्ज्ञांच्या देखरेखीखाली गेलो आहे. खजूर आणि दुधाने वजन कमी होते, अशा चुकीच्या बातम्या पसरवल्या जात होत्या, त्या चुकीच्या आहेत. मी फक्त खजूरच खात नाही, तर अंडी, नट्स, डार्क चॉकलेट अशा गोष्टी वेगवेगळ्या टप्प्यांवर खात होतो. बऱ्याचदा मी सामान्य आहारही घेत होतो,” असं रणदीपने सांगितलं.

Story img Loader