सध्या सर्वत्र गणपती बाप्पाच्या आरत्या, मोदक, आरास आणि भक्तिमय वातावरण बघायला मिळत आहे. सेलिब्रिटीही यात मागे नाहीत. त्यांच्या घरच्या बाप्पाची आरास, त्यासाठी तयार होणारा प्रसाद आणि त्यामागची प्रक्रिया हे सर्व ते त्यांच्या चाहत्यांशी शेअर करत असतात. आपल्या लाडक्या गणरायाला केवळ घरातच नाही, तर सार्वजनिक मंडळांमध्ये जाऊन भेटण्याची संधी अनेक कलाकार सोडत नाहीत. यात लालबागचा राजा, चिंतामणी, मुंबईचा राजा अशा मंडळांना अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. सध्या काही सेलिब्रिटींनी व्हीआयपी दर्शनाचा लाभ घेतल्यामुळे सोशल मीडियावर नेटकरी बऱ्याच चर्चा करत आहेत.

सर्व सेलिब्रिटी रांगेत न लागता थेट बाप्पाच्या चरणी दर्शन घेत असल्याने या विषयावर बरीच चर्चा रंगली आहे. याचदरम्यान, अभिनेता रणदीप हुड्डाने मात्र एका वेगळ्या कृतीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रणदीपने लालबागच्या राजाचे दर्शन सामान्य लोकांप्रमाणे रांगेत उभे राहून घेतले, ज्यामुळे त्याचं खूप कौतुक होत आहे.

हेही वाचा…सोनाक्षीने आंतरधर्मीय लग्नाचा निर्णय सांगितल्यावर ‘अशी’ होती शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया; झहीर इक्बाल सासऱ्यांबद्दल म्हणाला…

रणदीप हुड्डा हा त्याच्या अभिनयासह कामातील समर्पण आणि साधेपणासाठी प्रसिद्ध आहे. शुक्रवारी, अभिनेता त्याची पत्नी लिन लैश्रामसह मुंबईच्या प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळाला भेट देण्यासाठी गेला होता. तिथे त्याने व्हीआयपी प्रवेश न निवडता, सामान्य लोकांबरोबर रांगेत उभं राहून बाप्पाचे दर्शन घेतले. या कृतीमुळे त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Randeep hooda take lalbaug darshan skipping vip line
रणदीपने लालबागचा राजा येथे सामान्य रांगेत दर्शन घेतले. या ‘एक्स’वर व्हायरल व्हिडीओवर युजरची कमेंट (Urban Asian x account video comment)

रणदीपने सामान्य रांगेत उभं राहून दर्शन घेतल्यामुळे नेटकरी त्याचं आणि त्याच्या पत्नीचं भरभरून कौतुक करत आहेत. ‘एक्स’वर एका युजरने लिहिलं, “रणदीप, तुम्ही खरे हिरो आहात. तुमच्यासारखे सर्वांनी रांगेत उभं राहून देवाचे दर्शन घ्यायला हवे,” . तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “तुम्ही ग्रेट आहात, तुम्ही इतरांना आरसा दाखवला आहे,”. या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर, एका वापरकर्त्याने “खूप छान रणदीप, गणपती बाप्पा मोरया,” असे लिहून रणदीपचे कौतुक केले आहे.

randeep hooda public queue at lalbaugcha raja
अभिनेता रणदीप हुड्डा पत्नी लिन लैश्रामसह मुंबईच्या प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळ येथे सामान्य रांगेतून दर्शन घेतले. (व्हायरल व्हिडीओ कमेंट/ Urban Asian x account video)

हेही वाचा…मलायका अरोराच्या वडिलांचे निधन, मैत्रिणीसाठी करीनाने पुढे ढकलली तिची सगळी कामं

randeep hooda skips vip line in lalbaugcha raja took darshan in general line
लालबागचा राजा येथे रणदीप हुड्डाने सामान्य रांगेत दर्शन घेतले. या ‘एक्स’वर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर युजरची कमेंट (Urban Asian x account video comment)

नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये दिसतं की, लालबागच्या राजाचं दर्शन घेणाऱ्या सामान्य भाविकांना स्वयंसेवक घाईघाईने बाहेर काढत होते, तर व्हीआयपी रांगेतील लोक बाप्पासमोर फोटो काढत होते. त्यामुळे व्हीआयपी दर्शनाबद्दल सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू आहेत.

हेही वाचा…लंडनमध्ये दुकानदाराने अमिताभ बच्चन यांचा केलेला अपमान, बिग बींना त्याला शांतपणे असं उत्तर दिलं की…; स्वतः सांगितला किस्सा

यापूर्वी सनी लिओनीने पती डॅनियल वेबरसह, पत्रलेखा राजकुमार रावबरोबर, शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रासह आणि इतर सेलिब्रिटी जोडप्यांनी लालबागच्या राजाला व्हीआयपी रांगेतून भेट दिली होती. विकी कौशल, अपारशक्ती खुराना, सई मांजरेकर, परिणीती चोप्रा आणि इतर सेलिब्रिटींनीही बाप्पाचे आशीर्वाद घेतले होते.

Story img Loader