गुन्हेगारी विश्वात ‘बिकिनी किलर’ या नावाने कुख्यात असलेला फ्रेंच सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या सुटकेचे निर्देश नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. वयाच्या आधारावर त्याला सोडण्यात आले असल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. दोन अमेरिकी पर्यटकांच्या हत्येच्या आरोपाखाली चार्ल्सला २००३ मध्ये नेपाळमध्ये अटक करण्यात आली होती. चार्ल्सच्या आयुष्यावर एक चित्रपट आणि एक वेबसीरिजदेखील बनली आहे. त्याच्या आयुष्यावर बेतलेला ‘मैं और चार्ल्स’ हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा याने चार्ल्सची भूमिका साकारली होती. यामध्ये त्याच्याबरोबर रिचा चड्ढा आदिल हुसेनसारखे कलाकारही त्यात दिसले. या चित्रपटात रणदीपच्या कामाची खूप प्रशंसा झाली होती. रणदीपने साकारलेला चार्ल्स हा इतका हुबेहूब होता की कुणीही त्यात गोंधळून जाईल, अशीच एक घटना नुकतीच घडली आहे.

आणखी वाचा : जेव्हा चार्ल्स शोभराजला भेटायला तुरुंगात गेला होता रणदीप हुड्डा; ‘बिकिनी किलर’ने विचारलेला ‘हा’ प्रश्न

चार्ल्स शोभराजच्या सुटकेची बातमी एका नामवंत वृत्तपत्रात छापताना त्या बातमीबरोबर जो फोटो जोडला आहे तो मात्र रणदीपने साकारलेल्या चित्रपटातील भूमिकेचा असल्याने यावर चांगलीच चर्चा होत आहे.

खुद्द रणदीपने ट्वीटच्या माध्यमातून ही गोष्ट निदर्शनास आणून दिली आहे. चित्रपटातील त्याचा फोटो आणि वृत्तपत्रात आलेला फोटो शेअर करत रणदीपने ट्वीट करत लिहिलं की, “ही खरंच प्रशंसा आहे की खरंच तुम्ही खऱ्या आणि चित्रपटातील चार्ल्स शोभराजमध्ये फरक करू शकला नाहीत?” असा प्रश्न रणदीपने विचारला होता. रणदीपने केलेलं हे ट्वीट पाहून कित्येकांनी त्यांनी साकारलेल्या भूमिकेची प्रशंसा केली आहे.