अभिनेता रणदीप हुड्डा बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. गेले काही महिने त्याचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट फारच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच सर्वांचं लक्ष या चित्रपटाकडे लागलं आहे. या चित्रपटाच्या कामात काय प्रगती होत आहे हे वेळोवेळी चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांशी शेअर केलं आहे. अभिनेत्याने नुकतंच या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल खुलासा केला आहे.

सर्वप्रथम हा चित्रपट प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक महेश मांजरेकर दिग्दर्शित करणार होते. नंतर मांजरेकरांनी यातून काढता पाय घेतल्यानंतर यातील प्रमुख अभिनेता रणदिप हुड्डाने याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली. मध्यंतरी या चित्रपटाची एक झलक शेअर करण्यात आली अन् यावर्षी जानेवारीमध्ये हा चित्रपट येणार अशी चर्चादेखील होत होती. पण नंतर बरेच महीने याबद्दल काहीच माहिती समोर आली नाही. आज महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त एक पोस्ट शेअर करत रणदीप हुड्डाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
Diljit Dosanjh invokes Rahat Indori poetry amid calls to cancel Indore concert
कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी बजरंग दलाचे आंदोलन, दिलजीत दोसांझ म्हणाला, “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
rashmika mandanna watched pushpa 2 with vijay deverakonda
रश्मिका मंदानाने विजय देवरकोंडाच्या कुटुंबियांसह पाहिला ‘पुष्पा २’ सिनेमा, फोटो झाला व्हायरल

आणखी वाचा : “आजच्या पिढीला हा चित्रपट…” ‘गुंडा’ चित्रपटाबद्दल मुकेश ऋषी प्रथमच उघडपणे बोलले

एक खास व्हिडीओ शेअर करत रणदीप हुड्डाने प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना त्याने लिहिलं, “भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन हीरो, एकाला लोकांनी डोक्यावर घेतलं तर दुसऱ्याला इतिहासाच्या पानांतून वगळलं. आज या दिवशी इतिहास पुन्हा लिहिला जाईल.” अशी पोस्ट शेअर करत रणदीपने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली.

२२ मार्च २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा चित्रपट प्रामुख्याने हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात रणदीप हुड्डासह अंकिता लोखंडे व अमित सियाल हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटासाठी रणदीप हुड्डानेही प्रचंड मेहनत घेतलेली आहे. प्रेक्षक त्याला या भूमिकेत पाहण्यासाठी फारच उत्सुक आहेत.

Story img Loader