Swatantryaveer Savarkar Trailer: भूमिका कोणतीही असो, त्या भूमिकेशी अगदी समरस होऊन काम करणाऱ्या काही मोजक्या मेहनती अभिनेत्यांच्या यादीत रणदीप हुड्डा हे नाव हमखास येतंच. आजवर रणदीपने विवध भूमिका साकारल्या आहेत. पण सध्या मात्र तो त्याच्या आगामी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच सर्वांचं लक्ष या चित्रपटाकडे लागलं आहे. सर्वप्रथम हा चित्रपट महेश मांजरेकर दिग्दर्शित करणार होते. काही कारणास्तव महेश मांजरेकर यांनी यातून काढता पाय घेतला अन् दिग्दर्शनाची धुरा रणदीपने स्वतःच्या खांद्यावर पेलली.

गेल्यावर्षी या चित्रपटाचा टीझर लोकांसमोर आला. तेव्हापासूनच या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. आता या चित्रपटाचा दमदार ट्रेलरसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझरप्रमाणेच ट्रेलरही प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाराच आहे. ट्रेलरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील मुख्य घटनांवर आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानावर प्रामुख्याने प्रकाश टाकण्यात आला आहे.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
nehru literature soon in one click available on digital form on mobile
नेहरूंचे साहित्य लवकरच एका क्लिकवर!
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर

आणखी वाचा : अक्षय कुमारला लोकसभेचं तिकीट? दिल्लीच्या ‘या’ सीटवरुन निवडणूक लढवण्याची शक्यता

याबरोबरच विनायक दामोदर सावरकर आणि महात्मा गांधी यांच्यातील वैचारिक मतभेददेखील उघडपणे दाखवण्यात आले आहेत. याबरोबरच सावरकरांना देण्यात आलेल्या दोन जन्मठेपेच्या शिक्षा, शिक्षा भोगून आल्यानंतर भारतात त्यांच्यावर अन् त्यांच्या कुटुंबावर झालेला अन्याय, त्यांना मिळालेली दुय्यम वागणूक यावरही चित्रपटात भाष्य करण्यात आलं आहे. चित्रपटात दमदार संवाद आपल्याला ऐकायला मिळणार आहेत याची झलकही ट्रेलरमध्ये दिसली आहे.

सावरकर यांच्याबरोबरच लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, मोहम्मद अली जिन्ना, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बॉस, भिकाजी कामा, मदनलाल धिंगरा, भगत सिंह इत्यादि क्रांतिकराकांच्या भूमिकाही आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. चित्रपटात सावरकर यांची मुख्य भूमिका निभावणाऱ्या रणदीप हुड्डा याच्या अभिनयाची जबरदस्त चर्चा होत आहे, रणदीप या भूमिकेसाठी घेतलेल्या मेहनतीचं प्रचंड कौतुक होत आहे. याबरोबरच यमुनाबाई यांच्या भूमिकेत दिसणाऱ्या अंकीता लोखंडेचंही प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे.

ट्रेलरखाली लोकांनी कॉमेंट करत याबद्दल उत्सुकता व्यक्त केली. अद्याप चित्रपट प्रदर्शितदेखील झालेला नाही, परंतु आत्ताच ट्रेलर पाहून या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा अशी इच्छा लोकांनी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. झी स्टुडिओज, आनंद पंडित, संदीप सिंह आणि रणदीप हुड्डा यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर उत्कर्ष नैथानी व रणदीप यांनी मिळून याचे संवाद लिहिले आहेत. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट २२ मार्च रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.