मागच्या काही काळापासून अभिनेता रणदीप हुड्डा त्याच्या आगमी चित्रपट ‘स्वातंत्रवीर सावकर’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण याबरोबरच तो स्वतःच या चित्रपटाचा दिग्दर्शन करणार असल्याचंही बोललं जातं. अशातच आता त्याने त्याचं रिलेशनशिप ऑफिशियल करत चाहत्यांना सरप्राइज दिलं. रणदीप हुड्डा ‘मेरी कोम’ चित्रपटातील अभिनेत्रीच्या प्रेमात असून नुकतंच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याने याची माहिती दिली आहे.

रणदीप हुड्डाने त्याच्या इन्स्टाग्रामवर दिवाळीच्या निमित्ताने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तो गर्लफ्रेंड लिन लैशरामबरोबर दिसत आहे. रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या जोडीचे सर्वजण कौतुक करत आहेत. रणदीपने लिनसोबतचे फोटो शेअर करताना लिनला डेट करत असल्याचं लिहिलेलं नाही पण दिवाळीच्या मुहूर्तावर त्याने ज्या प्रकारे लिनचे फोटो कुटुंबियांसह शेअर केल्याने लिन रणदीप हुड्डाच्या आयुष्याचा एक भाग असल्याचं बोललं जात आहे.

Saif Ali Khan
हल्ल्यानंतरचा सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानबरोबरचा अनसीन फोटो आला समोर
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Sana Khan reveals name of her son shares first family photo
सना खान दुसऱ्यांदा झाली आई, फोटोंमध्ये दाखवली धाकट्या मुलाची झलक; नावही केलं जाहीर
Mohammed Siraj Zanai Bhosle Affair Asha Bhosle Granddaughter Breaks Silence on Relationship Rumours with Instagram Story
Mohammed Siraj Zanai Bhosle: मोहम्मद सिराज व आशा भोसलेंची नात खरंच एकमेकांना डेट करतायत? जनाईने फोटो पोस्ट करत केला खुलासा
Purva Kaushik
‘शिवा’ फेम पूर्वा कौशिकने ऑनस्क्रीन बहिणीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाली…
Image Of Saif Ali Khan And Bhajan Singh.
Saif Ali Khan : रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षाचालकाला सैफने मारली मिठी, भजन सिंग म्हणाले, “इतक्या मोठ्या स्टार्सना…”
shraddha kapoor rahul mody twinning
श्रद्धा कपूरनं बॉयफ्रेंडसह केलं Twinning, अभिनेत्रीने शेअर केलेला ‘तो’ फोटो चर्चेत
Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…

आणखी वाचा- ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल नवीन अपडेट, रणदीप हुड्डाने केली ‘ही’ मोठी घोषणा

लिन लैशराम मूळची मणिपूरची आहे. ती एक प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. लिन लैशरामने ‘मेरी कॉम’, ‘रंगून’ आणि ‘उमरिका’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. शाहरुख खान स्टारर ‘ओम शांती ओम’मध्ये ती पहिल्यांदा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. लिन लैशरामने मिस नॉर्थ ईस्ट सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यात ती फर्स्ट रनरअप राहिली होती. लिन लैशराम ही नॅशनल टेलिव्हिजनवर स्विमसूट परिधान करणारी पहिली मणिपुरी मॉडेल आहे. ती तिरंदाजीत ज्युनियर नॅशनल चॅम्पियन राहिली आहे. याशिवाय ती एक बिझनेसवूमन असून तिचा स्वतःचा दागिन्यांचा व्यवसायही आहे.

आणखी वाचा- अंकिता लोखंडे पहिल्यांदाच दिसणार मुख्य भूमिकेत, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटातील फर्स्ट लूक समोर

काही रिपोर्ट्सनुसार, रणदीप हुडा आणि लिन लैशराम २०१८ मध्ये एका स्टेडियममध्ये एकत्र दिसले होते. याआधीही दोघांना अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिले गेलं होतं. तेव्हापासून दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम लिव्ह इनमध्ये राहत असल्याचंही बोललं जात आहे. आता रणदीप हुडाने आता लिनची ओळख आई- वडिलांशी करून दिली आहे, त्यामुळे ते लवकरच लग्न करणार असल्याचीही चर्चा आहे.

Story img Loader