राणी मुखर्जी आणि विवेक ओबेरॉय यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘साथिया’ चित्रपट २००२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. तगडी स्टारकास्ट, उत्तम कथानक, यश चोप्रांची निर्मिती, ए.आर.रहमानचं संगीत या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असलेल्या ‘साथिया’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुद्धा चांगली कमाई केली होती. परंतु, सुरुवातीला या चित्रपटासाठी राणीने नकार दिला होता. त्यानंतर यश चोप्रांनी तिची कशी समजूत काढली याबद्दल अभिनेत्रीने न्यूज १८च्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

राणी मुखर्जी म्हणाली, “‘मुझसे दोस्ती करोगी’ या चित्रपटाने त्यावेळी फारच निराशजनक कामगिरी केली होती. तो चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर माझ्याकडे जवळपास आठ महिने कोणतंही काम नव्हतं. मी घरात असायचे…अनेक ठिकाणी राणीचं करिअर आता संपलं आहे अशा बातम्या सुद्धा येऊ लागल्या होत्या.”

हेही वाचा : Video : मुंबई सोडून महाबळेश्वरच्या शेतात रमली मृण्मयी देशपांडे! नवऱ्याबरोबर करतेय स्ट्रॉबेरीची लागवड, पाहा व्हिडीओ

राणी पुढे म्हणाली, मला त्या बातम्यांचा खरंच काहीच फरक पडत नव्हता. मी फक्त एका चांगल्या प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत होते. त्यानंतर मला यश अंकलने ‘साथिया’ चित्रपटासाठी विचारलं. पण, मला कोणताही चुकीचा निर्णय घ्यायचा नव्हता. मनात वेगळीच भीती होती. त्यामुळे त्यांना नकार कळवला होता. यश अंकलने माझ्या आई-बाबांना ऑफिसमध्ये बोलावून घेतलं होतं. त्यावेळी माझ्या आई-बाबांनी, “राणीला हा चित्रपट करण्याची अजिबात इच्छा नाहीये” असं त्यांना सांगितलं होतं.

“आई-बाबांशी चर्चा केल्यावर यश अंकलने मला फोन केला. ते म्हणाले होते, ‘बेटा तू खूप मोठी चूक करत आहेस. मी आता तुझे आई-बाबा ज्या खोलीत आहेत तो दरवाजा बंद करून घेतला आहे. जोपर्यंत तू चित्रपटासाठी होकार कळवत नाहीस तोपर्यंत तुझ्या आई-बाबांना मी बाहेर जाऊ देणार नाही.’ मी त्यांची खरंच आभारी आहे त्यांच्यामुळे मला एवढा सुंदर चित्रपट करता आला.” असं राणी मुखर्जीने या मुलाखतीत सांगितलं.

हेही वाचा : ‘झी मराठी’वर ४ डिसेंबरपासून होणार मोठा बदल! दोन लोकप्रिय मालिकांचं दुपारी होणार प्रक्षेपण, तर चला हवा येऊ द्या…

दरम्यान, १३ ऑक्टोबर २०१२ मध्ये यश चोप्रा यांचं निधन झालं. पुढे २०१४ मध्ये राणीने यशजींचा मोठा मुलगा आदित्य चोप्राबरोबर लग्न केलं. आता दोघांनाही आदिरा नावाची गोड मुलगी आहे.

Story img Loader