‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात शाहरुख खान आणि काजोलशिवाय अभिनेत्री राणी मुखर्जीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात ती टीनाच्या भूमिकेत दिसली होती. एका मुलाखतीदरम्यान राणी मुखर्जीने सांगितलं की त्यावेळी ती फक्त १७ वर्षांची होती. इतक्या लहान वयात आईची भूमिका साकारणे तिच्यासाठी खूप आव्हानात्मक होते. राणी मुखर्जीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये राणी मुखर्जी म्हणाली की, टीनाची भूमिका साकारणे त्यावेळी सर्वात आव्हानात्मक होते. अभिनेत्री म्हणाली, “मी १७ वर्षांची असताना ‘कुछ कुछ होता है’मध्ये आईची भूमिका साकारली होती. पण, सुदैवाने, त्या चित्रपटात मी भूताच्या स्वरूपात आई बनले होते.” मात्र, या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी राणी मुखर्जीने केलेल्या वयाबद्दलच्या दाव्याचे खंडन केले आहे.
आणखी वाचा : ६१ व्या वर्षीही सुनील शेट्टी इतका फिट कसा? अभिनेत्याने सांगितलं फिटनेसमागील रहस्य; म्हणाला…
काही लोकांचे म्हणणे आहे की, चित्रपट रिलीज झाला तेव्हा राणी १७ वर्षांची नसून २० वर्षांची होती. त्याचवेळी काही लोक या भूमिकेत आव्हानात्मक असं काहीच नव्हतं असं म्हणून राणीची खिल्ली उडवत आहेत. एका यूजरने कॉमेंटमध्ये लिहिले की, “राणीचा जन्म १९७८ मध्ये झाला होता. कुछ कुछ होता है १९९८ मध्ये रिलीज झाला. मग तिचं वय १७ वर्षं कसं असेल?”
एकूणच या व्हिडिओमुळे राणी मुखर्जी ही ‘कुछ कुछ होता है’ च्या वेळी १७ वर्षांची नक्की नव्हती अशी ठाम समजूत नेटकऱ्यांची झाली आहे. राणी नुकतीच ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिमा छिब्बर यांनी केले होते. अलीकडेच राणी मुखर्जीने इंडस्ट्रीमध्ये नवीन दिग्दर्शकांसोबत काम करण्याचा तिचा अनुभव शेअर करत त्यांचे कौतुक केले आहे.