करण जोहरचे सुरुवातीचे सिनेमे हे कौटुंबिक सिनेमे मानले जायचे. करणचा सिनेमा येणार म्हणजे प्रेक्षक सहकुटुंब सिनेमागृहात जायचे. परंतु एक चित्रपट असा होता ज्याने हा समज मोडून काढला. तो चित्रपट म्हणजे ‘कभी अलविदा ना केहना’. खुद्द करण जोहरनेही या चित्रपटामुळे त्याच्यावर झालेल्या टिकेबद्दल त्याचे आत्मचरित्र ‘अॅन अनसुटेबल बॉय’मध्येही सांगितलं आहे. यामागील कारणं बरीच होती.

‘कभी अलविदा ना केहना’ या चित्रपटाच्या माध्यमातून विवाहबाह्य संबंध आणि शारीरिक आकर्षण अशा दोन महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं, परंतु त्यावेळी करण जोहरच्या चित्रपटातून अशा गोष्टी अपेक्षित नसल्याने हा प्रयोग तेव्हा सपशेल आपटला. शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, किरण खेर, राणी मुखर्जी, प्रीती झिंटा, अशी तगडी स्टारकास्ट असूनसुद्धा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला.

Lakhat Ek Aamcha dada
Video: तेजूच्या लग्नाची सुपारी फुटली; डॅडी म्हणाले, “खरे नवरदेव…”, पाहा प्रोमो
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”
Abhishek Bachchan
अभिषेक बच्चनचं ‘ते’ वाक्य अन् अमिताभ बच्चन म्हणाले, “तुला शोमध्ये बोलवून चूक केली”; नेमकं काय घडलं?
vidya balan on sridevi
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं कौतुक करत विद्या बालनने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “मला त्यांना…”
shatrughan sinha cheated on poonam sinha
“पत्नीने मला एकदा रंगेहात पकडलं होतं…”, शत्रुघ्न सिन्हांनी स्वतःच केलेला खुलासा, म्हणाले होते…
Isha Koppikar first reaction on divorce with Timmy Narang
१४ वर्षांचा संसार मोडण्याचं कारण काय? पहिल्यांदाच बोलली ‘खल्लास गर्ल’; म्हणाली, “त्याने अत्यंत बेजबाबदारपणे…”

आणखी वाचा : “शाहरुख तुमचा वापर करून घेतो अन्…” किंग खानबद्दल अभिजीत भट्टाचार्यचं विधान चर्चेत

नुकतंच राणी मुखर्जीने गोव्यात सुरू असलेल्या ‘५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (IFFI) मध्ये या चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे ज्यामुळे राणीदेखील चर्चेत आली आहे. राणी म्हणाली, “मला असं वाटतं की कभी अलविदा ना केहनासारखा चित्रपट बऱ्याच जोडप्यांनी घटस्फोट घेतले, कारण हा चित्रपट प्रेक्षकांनी अगदी टोकाचा विचार करूनच पाहिला. करणलाही या चित्रपटाकडून याच प्रतिक्रिया आल्या. या चित्रपटाने बऱ्याच लोकांचे डोळे उघडले अन् त्यांनी स्वतःच्या आनंदाला प्राधान्य द्यायचं ठरवलं.”

पुढे राणी म्हणाली, “स्त्रीच्या इच्छा आणि तिची आवड याबद्दल भाष्य करायलाच हवं. एखादा पती केवळ आपल्या पत्नीला मारहाण करत नाही म्हणजे तो तिला सुखी ठेवत असेल तिच्या शारीरिक तसेच भावनिक गरजा पूर्ण करत असेल असा अर्थ अजिबात होत नाही, स्त्रियांचं मत याबाबतीत कधीच ग्राह्य धरलं जात नाही. खरंतर करणने ‘कभी अलविदा ना केहना’सारख्या बोल्ड चित्रपटातून हीच गोष्ट सांगायचं धाडस केलं. भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील हा काळाच्या बऱ्याच पुढचा चित्रपट आहे हे मात्र नक्की.”