अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या तिच्या ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा एक प्रमोशनल इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातील काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या चित्रपटाची कहाणी ज्या महिलेच्या खऱ्या आयुष्यावर बेतली आहे, त्या सागरिका चक्रवर्तींना स्टेजवर बोलावताच राणी मुखर्जीला अश्रू अनावर झाले. करण जोहरने रानीला सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण रडत असते, त्यानंतर सागरिका राणीला मिठी मारते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुस्लीम आई अन् हिंदू वडिलांच्या लग्नाआधीच जन्मलेले महेश भट्ट, लहानपणी झालेला त्रास आठवत म्हणाले, “माझी आई ओळख लपवण्यासाठी…”

या कार्यक्रमातील व्हायरल व्हिडीओंपैकी एका व्हिडीओमध्ये राणी मुखर्जी करण जोहरच्या पाया पडताना दिसत आहे. करण जोहरने हा कार्यक्रम होस्ट केला होता. यावेळी त्याने राणी मुखर्जीचे खूप कौतुक केले. स्टेजवर येताना राणी भावूक झाली आणि ती करण जोहरच्या पाया पडली. राणीने १९९७ मध्ये ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. पण, करण जोहरच्या ‘कुछ कुछ होता है’मधून तिला लोकप्रियता व ओळख मिळाली होती.

दरम्यान, ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट १७ मार्च २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राणी मुखर्जीबरोबर अनिर्बन भट्टाचार्य, जिम सरभ आणि नीना गुप्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिमा छिब्बर यांनी केले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rani mukerji touches karan johar feet at mrs chatterjee vs norway promotional event see video hrc