बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी २१ मार्च रोजी तिचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. राणी सध्या तिच्या ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात राणी आईची भूमिका साकारली आहे. दरम्यान, राणी मुखर्जीच्या वाढदिवसानिमित्त तिची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीत, राणीने तिच्या जन्मानंतरचा एक किस्सा सांगितला होता. तुम्हाला माहीत आहे का? की राणीची जन्मावेळी एका पंजाबी कुटुंबातील मुलासोबत अदलाबदल झाली होती.
राणीची डोळ्यावरुन पटली होती ओळख
राणीने मुलाखतीत सांगितले होते की, तिचा जन्म झाला तेव्हा ती चुकून एका पंजाबी जोडप्याच्या खोलीत पोहोचली होती आणि तिच्या आईच्या कुशीत डॉक्टरांनी एक दुसराच मुलगा दिला होता. पण, त्या मुलाला पाहून राणीच्या आईला समजले की हे आपले मूल नाही. यानंतर राणीच्या आईने दवाखान्यात चांगलाच गोंधळ घातला होता. राणीच्या आईने डॉक्टरांना सांगितले की, तिच्या मुलीचे डोळे तपकिरी आहेत. पण मला देण्यात आलेल्या मुलाचे डोळे तपकिरी नाहीत. त्यानंतर कृष्णा मुखर्जीनी स्वत: वॉर्डमध्ये जाऊन सगळ्या नवजात मुलांची तपासणी केली होती. तेव्हा राणी त्यांना एका पंजाबी कुंटुंबाजवळ आढळली होती. कृष्णा मुखर्जींनी बाळाच्या डोळ्यांवरुनच ओळखलं होतं की ही त्यांची राणी आहे.
हेही वाचा- “…म्हणून शाहरुखने शेवट बदलला” ‘मैं हूं ना’ चित्रपटातील क्लायमॅक्स सीनवरून सुनील शेट्टीचा खुलासा
बॉलिवूडशी आहे राणीचा जन्मापासून संबंध
राणी मुखर्जीचे वडील दिग्दर्शक-निर्माते राम मुखर्जी होते. राणीच्या मोठ्या भावाचे नाव राजा मुखर्जी आहे. राणी मुखर्जी ही बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि ‘ब्रह्मास्त्र’ दिग्दर्शक अयान मुखर्जीची चुलत बहीण आहे. आज वाढदिवसानिमित्त चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.