२०१४ साली राणीची प्रमुख भूमिका असलेला ‘मर्दानी’ चित्रपट आला. या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत असलेली राणी सर्वांनाच खूप आवडली. लहान मुलांचं सेक्स रॅकेट चालवणाऱ्या गँगचा पर्दाफाश करणाऱ्या डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेतील राणीने सर्वांकडूनच कौतुक मिळवलं. पहिल्या भागाला मिळालेल्या प्रतिसादानंतर २०१९ साली या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. या चित्रपटात देखील राणीने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली. तर आता ‘मर्दानी ३’बद्दल मोठी बातमी समोर आली आहे.

राणी मुखर्जी सध्या तिच्या ‘मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटामुळे ती बऱ्याच मुलाखती देत आहे. अशाच एका मुलाखतीमध्ये ‘मर्दानी ३’बद्दल बोलली. तुला पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकाराला आवडेल का असा प्रश्न तिला नुकताच एका मुलाखतीत विचारण्यात आला. यावर राणीने दिलेल्या उत्तराने सर्वांचंच लक्ष वेधलं.

आणखी वाचा : “लेकीला आतापर्यंत मीडियापासून दूर ठेवलं कारण…” अखेर राणी मुखर्जीने केला खुलासा

‘मर्दानी’ चित्रपटाच्या फ्रेंचायझीबद्दल राणी म्हणाली, “मला पुन्हा एकदा शिवानी रॉय ही भूमिका साकारायला खरोखरच आवडेल. पण हे सगळं चित्रपटाची कथा आणि स्क्रिप्ट यावर अवलंबून आहे. पण मला वाटतं की शिवानी रॉयच्या भूमिकेत पुनरागमन करणं हे खूप इंटरेस्टिंग असेल कारण मला ही भूमिका साकारताना खूप मजा येते.”

हेही वाचा : मोजकेच पण आशयघन चित्रपट करणारी राणी मुखर्जी आहे ‘इतक्या’ कोटींची मालकीण, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क

राणीच्या या बोलण्यामुळे आता ती ‘मर्दानी ३’ चित्रपटावर काम करत आहे का?, ती पुन्हा एकदा या भूमिकेत दिसणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत. त्यामुळे ‘मर्दानी ३’ चित्रपट प्रदर्शित व्हावा अशी मागणी तिचे चाहते करत आहेत.