रणदीप हुड्डाची मुख्य भूमिका असलेला ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच २२ मार्च रोजी हा चित्रपट हिंदी व मराठी या दोन भाषांमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. यात अंकिता लोखंडे आणि अमित सियाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका असून रणदीप हुड्डा या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. या चित्रपटाबद्दल विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रणजीत सावरकर यांनी रणदीप हुड्डाचं कौतुक केलं आहे. ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटासाठी आपली रणदीपशी खूपदा चर्चा झाली होती, त्याने स्वतःला झोकून देऊन काम केलं आहे, असं त्यांनी नमूद केलं. “रणदीप हुड्डाबरोबर माझी अनेकवेळा चर्चा झाली. त्याने खूप मेहनत घेऊन हा चित्रपट बनवला आहे, त्याने या भूमिकेसाठी ३० किलो वजन कमी केले,” असं रणजीत ‘एएनआय’ला म्हणाले.

“आम्हाला धर्माची पर्वा नव्हती,” २२ वर्षांपूर्वी मोडलेल्या लग्नाबाबत विंदू दारा सिंगचे विधान; तब्बूच्या बहिणीशी झाला होता विवाह

ऐतिहासिक घटनांचे जतन करण्यासाठी चित्रपट महत्त्वाचे आहेत. तरुणांना इतिहास कळावा, यासाठी वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांबद्दल अधिक चित्रपटांची निर्मिती करायला हवी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. “चित्रपट हे एक असं माध्यम आहे, ज्याद्वारे इतिहास नव्या पिढीसमोर मांडता येऊ शकतो. मला आशा आहे की वीर सावरकर आणि इतर क्रांतिकारकांवर आणखी चित्रपटांची निर्मिती होईल,” असं रणजीत सावरकर म्हणाले.

“तिने मला जवळ ओढलं अन्…”, विजय वर्माने सांगितला सारा अली खानसोबत इंटिमेट सीन करण्याचा अनुभव

हा प्रोपगंडा चित्रपट असून यात गांधींचा अपमान केला आहे, असे आरोप ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमावर झाले. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना रणदीपने ‘डीएनए’शी बोलताना प्रतिक्रिया दिली. “मी गांधीजींचा अपमान करतोय, असं नाही. पण हा सावरकरांबद्दलचा चित्रपट आहे, मला त्यांचं म्हणणं मांडायचं आहे. रिचर्ड ॲटनबरो यांनी गांधींवर निर्माण केलेल्या चित्रपटात सावरकर नव्हते. मी अतिशय काळजीपूर्वक विचार करून चित्रपट तयार केला आहे. गांधीजींनीही काही चुका केल्या, सावरकरांनीही काही चुका केल्या आणि भगतसिंग यांनीही काही चुका केल्या. आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांना एखाद्या व्यक्तीबद्दलच्या काही गोष्टी चांगल्या वाटल्या होत्या, तर त्यांच्या काही गोष्टी एकमेकांपासून खूप वेगळ्या होत्या. भगतसिंग गांधीजींपेक्षा वेगळे होते, गांधीजी सुभाषचंद्र बोस यांच्यापेक्षा वेगळे होते, सुभाषजी इतरांपेक्षा वेगळे होते. त्यामुळे त्यांच्यात नेहमीच मतभेद होते, पण त्यांच्यात काही गोष्टी समान होत्या,” असं रणदीप म्हणाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranjit sawarkar reaction on swatantrya veer savarkar movie by randeep hooda hrc