करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पुढच्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, प्रदर्शनापूर्वी सेन्सॉर प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. बॉलीवूड हंगामाने दिलेल्या माहितीनुसार सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) अर्थात ​​सेन्सॉर बोर्डाने रणवीर- आलियाच्या आगामी चित्रपटात काही बदल सुचवले आहेत. तसेच वादग्रस्त शब्दांवर आक्षेप नोंदवत ते शब्द चित्रपटातून हटवण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “तुम्ही खूप प्रेम…”, महाराष्ट्राच्या हास्यजत्रेला अमेरिकेत मिळणारा प्रतिसाद पाहून वनिता खरात भारावली, शेअर केला भावुक व्हिडीओ

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या संबंधित असणारे संपूर्ण वाक्य काढून टाकण्यात आले आहे. सेन्सॉरने सुचवलेले बदल निर्मात्यांनी अमलात आणल्यानंतर चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यात आले. या चित्रपटात केले गेलेले बदल खालीलप्रमाणे आहेत…

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’चे आगळेवेगळे कथानक कसे सुचले, कोण आहे चित्रपटाची लेखिका? जाणून घ्या…

१. चित्रपटातील आक्षेपार्ह आणि अपमानास्पद शब्द बदलून त्याजागी ‘बेहेन दी’ हा शब्द घेतला आहे.

२. चित्रपटातील एका सीनमध्ये मद्यपानाच्या उल्लेखात ‘ओल्ड मॉन्क’ शब्द आला होता. याजागी ‘बोल्ड मॉन्क’ शब्द करण्यात आला आहे. यापूर्वी सेन्सॉरने शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटात ‘स्कॉच’च्या जागी ‘ड्रिंक’ शब्द वापरण्यास सुचवले होते.

३. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील एका दृश्यात ‘लोकसभा’ हा शब्द वापरण्यात आला होता. हा शब्द सेन्सॉर बोर्डाने पूर्णपणे काढून टाकण्यास सांगितला.

४. चित्रपटात रविंद्रनाथ टागोर यांच्या संबंधित एक सीन होता, ज्यामुळे ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर वाद निर्माण झाला होता. या जागी फिल्टर टाकण्यात येणार आहे. तसेच रविंद्रनाथ टागोर यांचा उल्लेख चित्रपटातून हटवण्यात आला आहे.

५. चित्रपटात आलिया भट्ट अर्थात ‘राणी चॅटर्जी’ हे पात्र पश्चिम बंगालचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या संबंधित संपूर्ण वाक्य काढून टाकण्यात आले आहे.

६. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधील एक सीन एका अंतर्वस्त्राच्या दुकानातील होता. या दृश्यातील महिलांविषयीचा अपमानास्पद शब्द काढून टाकण्यात आला आहे. याच सीनमध्ये ‘ब्रा’ या शब्दाऐवजी Item हा शब्द वापरण्यास सांगितले आहे.

हेही वाचा : भूमी पेडणेकरने गोव्यात सुरु केलं आलिशान KAIA रेस्टॉरंट, नावात दडलाय खास अर्थ

सेन्सॉरकडून चित्रपटाला नमूद केलेल्या बदलांनंतर १९ जुलैला प्रमाणपत्र देण्यात आले आहे. प्रमाणपत्रानुसार चित्रपट २ तास ४८ मिनिटांचा आहे. दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट २८ जुलैला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह मुख्य भूमिका साकारणार आहेत. तसेच यामध्ये दिग्गज अभिनेत्री जया बच्चन, अभिनेते धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh and alia bhatt rocky aur rani kii prem kahaani undergoes cuts cbfc replace abusive words sva 00
Show comments