Rocky aur Rani Ki Prem Kahaani Box office collection Day 5 : करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. २८ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी दमदार कमाई केली आहे. या चित्रपटातील आलिया भट्ट आणि रणवीर सिंहची जोडी आणि त्यांची केमेस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे. वीकेंडला चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ११.१० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर शनिवारी दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत ४४.५९ टक्के वाढ झाली आणि १६.५ कोटींचा गल्ला जमवला. चित्रपटाने रिलीजच्‍या तिसर्‍या दिवशी म्हणजेच रविवारी १८ कोटी रुपयांचे ग्रँड कलेक्‍शन केले. आता नुकतंच याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवसाचे आकडे समोर आले आहेत.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…

आणखी वाचा : OTT चाहत्यांसाठी खुशखबर; सर्वात लोकप्रिय वेब शो ‘ब्रेकिंग बॅड’ लवकरच हिंदीत पाहायला मिळणार

‘बॉलिवूड हंगामा’च्या रीपोर्टनुसार या चित्रपटाने मंगळवारी ७.२५ ते ७.७५ कोटींचा व्यवसाय केला आहे. बॉक्स ऑफिसच्या मंडे टेस्टमध्येही चित्रपट पास झाला असून आत्तापर्यंत या चित्रपटाने भारतात जवळपास ६०.१७ कोटींची कमाई केली आहे. चित्रपट समीक्षक आणि ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनीही चित्रपटाचं कौतुक केलं आहे अन् पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट ७० कोटींचा आकडा पार करेल अशी शक्यताही वर्तवली आहे. इतकंच नव्हे तर हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यापर्यंत १०० कोटींचा टप्पाही पार करेल असंही म्हंटलं जात आहे.

या चित्रपटातून करण जोहरने तब्बल ८ वर्षांनी पुन्हा दिग्दर्शक म्हणून कमबॅक केलं आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये आलियाने बंगाली मुलीची तर रणवीरने पंजाबी मुलाची भूमिका साकारली आहे. तसेच धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी, क्षिती जोग यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

Story img Loader