Rocky aur Rani ki Prem Kahani Review : बॉलिवूड कधी मॅच्युअर होणार? हा प्रश्न करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ पाहिल्यावर आपल्याला नक्कीच पडू शकतो. अर्थात या प्रश्नाचं उत्तरही बहुदा इतक्यात मिळणं कठीण आहे हे हा चित्रपट पाहून लक्षात येईल. २०१६ नंतर तब्बल सात वर्षांनी दिग्दर्शक म्हणून कमबॅक करणाऱ्या करण जोहरकडून ज्या अपेक्षा होत्या अगदी तसाच हा चित्रपट आहे, पण या चित्रपटात एक कौटुंबिक बाजू अधोरेखित करायचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यात मात्र करण जोहर हा सपशेल फसला आहे. करण जोहरच्या टिपिकल अशा ग्रँड स्टाईलमध्ये बनलेला हा चित्रपट समाजाला उपदेशाचे डोस पाजायला जातो अन् तिथेच तो चित्रपट बेगडी वाटायला लागतो.

रॉकी आणि रानीबरोबरच ही कथा आहे रंधावा आणि चॅटर्जी परिवाराची. एक दिल्लीतील टिपिकल पंजाबी कुटुंब आणि दुसरं आधुनिक व खुल्या विचारांचं आणि कौटुंबिक मूल्यं जपणारं बंगाली कुटुंब. दोन्ही कुटुंबातील वृद्ध व्यक्तीची अधुरी राहिलेली प्रेम कहाणी पूर्ण करण्यासाठी रॉकी आणि रानी एकत्र येतात, अन् स्वतःच प्रेमात पडतात. नंतर मात्र दोघांनाही आठवण होते ती दोन भिन्न दिशांना तोंडं असलेल्या आपआपल्या कुटुंबाची. मग यावर तोडगा म्हणून दोघे एकमेकांच्या कुटुंबाशी जुळवून घेण्यासाठी एकमेकांच्या घरी राहायला जायचा निर्णय घेतात, आता हे दोघे एकमेकांच्या कुटुंबाशी जुळवून घेऊन लग्नगाठ बांधतात की नाही हा या चित्रपटाचा मूळ गाभा आहे.

Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
Saif Ali Khan Attack News Saba Pataudi Shares health updates
सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया पूर्ण; बहीण सबा पतौडीने दिली हेल्थ अपडेट, पोस्ट शेअर करत म्हणाली…
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”

आणखी वाचा : Oppenheimer Review : अणूबॉम्बच्या जनकाचा विचित्र पण तितकाच चित्तथरारक अन् खिळवून ठेवणारा प्रवास…

अतिशय साधी आणि सामान्य कथा असलेल्या या चित्रपटाला करण जोहरने त्याच्या नेहमीच्या भव्यदिव्य पद्धतीने सादर केलं आहे, अन् त्यात तो यशस्वी झाला आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाऊससारखंच भव्य रंधावा पॅलेस, ऊंची आणि तितकेच हटके फॅशन असलेले कपडे, जबरदस्त लोकेशन्स, मोठमोठे स्टार्स, नेपोकिड्सची मांदियाळी, भव्यदिव्य सेट्स, सुपरहीट गाण्यांवर नाचणारे हजारो डान्सर्स हे सगळं यात भरभरून पाहायला मिळतं. पण मस्त चविष्ट अशी बिर्याणी खाताना मध्येच दाताखाली आलेली लवंग कशी आपली चव बिघडवते अगदी तसंच या कमर्शियल चित्रपटात दिलेले उपदेशाचे डोस ऐकून आपला मूड खराब होतो.

करण जोहरने या चित्रपटात ही गोष्ट कटाक्षाने टाळली असती तर कदाचित हा चित्रपट एक मास एंटरटेनर बनू शकला असता. आलियाला संपूर्ण चित्रपटात बॅकलेस किंवा डिपनेक ब्लाऊज देऊन तिच्याच तोंडी महिलांना ऑब्जेक्टीफाय करण्याबद्दल जे संवाद दिले आहेत ते पाहून खरंच आपलं डोकं फिरतं. चित्रपटात आलियाचं पात्र हे एका मीडिया चॅनलमधील प्रसिद्ध सूत्रसंचालीकेचं दाखवलं असून संपूर्ण चित्रपटात महिलांच्या अधिकारांविषयी, स्त्रीसशक्तीकरणाविषयी भरभरून बोलताना तिला दाखवलं आहे, पण प्रत्यक्ष चित्रपटात मात्र एवढ्या शिकलेल्या मुलीला रॉकीसारख्या मुलाच्या मागे मागे फिरतानाच दाखवलं आहे. केवळ पुरुषप्रधान संस्कृती अन् पुरुषी अहंकाराच्या विरोधात गळे काढून काही होत नसतं त्यासाठी तुमच्या चित्रपटातील महिला पात्र हे प्रत्येक कृतीतून तितकं खंबीर वाटायला हवं.

खरंतर या सगळ्या गोष्टी करण जोहरकडून अपेक्षित नाहीत. कारण करणने ‘कभी खुशी कभी गम’सारखे गल्लाभरू चित्रपट जरी केले असले तरी ‘माय नेम इज खान’ किंवा ‘कभी अलविदा ना कहना’सारखे लोकांच्या मनाला स्पर्श करणारे चित्रपटही दिले आहेत. करणचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ खरंतर या दोन्ही पठडीत न बसणाराच आहे. चित्रपटाचा पहिला भाग तरी थोडा वेगळा आहे, पण मध्यांतरानंतर मात्र चित्रपट लोकांना उपदेशाचे इतके डोस द्यायला सुरुवात करतो की प्रेक्षकांना ते अजीर्ण होतं. काही काही ठिकाणी चित्रपट तुम्हाला भावुक करतो पण त्यापलीकडे प्रेक्षकांच्या हाती फारसं काही लागत नाही.

चित्रीकरण, संगीत, गाणी हे करण जोहर स्टाईलप्रमाणे अप्रतिमच झालं आहे. प्रीतम यांनी दिलेली गाणी खरंच उत्तम आहेत आणि ती चित्रपटातही तितकीच उत्तमरित्या सादर केली गेली आहेत. याबरोबर सगळ्या कलाकारांची कामंही उत्तम झाली आहेत. आमिर बशीर, शबाना आजमी, तोता रॉय चौधरी, चुर्णी गांगुली, नमित दास यांची काम खूप सुंदर झाली आहेत. जया बच्चन या नेहमीप्रमाणेच लाऊड वाटतात, मराठमोळ्या क्षिति जोगनेही रणवीरच्या आईची भूमिका निभावली आहे अन् तिने उत्तमरित्या भूमिका साकारली आहे. धर्मेंद्र यांना फार स्क्रीन टाइम नसला तरी त्यांना बघूनही फार बरं वाटतं.

आणखी वाचा : Rocky Aur Rani ki Prem Kahani Review : समीक्षकांकडून चित्रपटाचं तोंडभरून कौतुक; तरण आदर्श यांनी ट्वीट करत दिले रेटिंग

रॉकीच्या भूमिकेत रणवीर सिंग अगदी चपखल बसला आहे अन् रानीची भूमिका आलियानेही उत्तम वठवली आहे. रानीचं पात्र लिहिण्यात थोडी आणखी प्रगल्भता दिसली असती तर हे पात्र नक्कीच आलियाच्या करिअरचं सर्वोत्तम पात्र ठरलं असतं. बाकी पडद्यावर आलियावरुन नजर हटत नाही इतकी ती यात सुरेख दिसली आहे. बॉलिवूडच्या टिपिकल स्टाइलचे अन् करण जोहरच्या ग्रँड चित्रपटाचे चाहते असाल अन् थोडे उपदेश ऐकून घ्यायची तयारी असेल तर तुम्ही नक्कीच हा चित्रपट पाहू शकता.

Story img Loader