करण जोहर दिग्दर्शित आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिका साकारणार आहेत. यामधील “तुम क्या मिले…” या पहिल्या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.

हेही वाचा : दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने केले टक्कल, तिरुपती मंदिराजवळील नवा लुक पाहून चाहते हैराण

daredevil series trailer release
Video: जबरदस्त अ‍ॅक्शन आणि थरारक स्टंट; मार्व्हलच्या Daredevil: Born Again चा ट्रेलर प्रदर्शित
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
pataal lok season 2 trailer
Pataal Lok 2 Trailer: जबरदस्त गूढ, अ‍ॅक्शन आणि ‘ती’ तारीख…, ‘पाताल लोक २’ चा ट्रेलर प्रदर्शित
Raveena Tandon daughter Rasha Thadani Uyi Amma In Azaad watch video
Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा ट्रेलरची सुरुवात कार अपघाताने होते. चित्रपटात रॉकी रंधवासमोर राणीच्या ( आलिया) रॉयल बंगाली कुटुंबाची मनधरणी करण्याचे सर्वात मोठे आव्हान असते. रॉकीच्या घरच्यांचा सुद्धा या लग्नाला विरोध असतो. एकमेकांच्या घरच्यांबरोबर जुळवून घेण्यात दोघेही अपयशी ठरतात आणि शेवटी आपले नाते संपवतात असे या ३ मिनिटे २१ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहेत. आता पुढे यांच्या प्रेमकहाणी काय ट्विस्ट येणार? दोघेही एकमेकांना पुन्हा कसे भेटणार याचा उलगडा २८ जुलैला सिनेमागृहांमध्ये होणार आहे.

हेही वाचा : Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार पोहोचले प्रियदर्शनी इंदलकरच्या गावी, “रानात फेरफटका, डाळिंबाचं शेत अन्…”

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’हा चित्रपट फॅमिली इमोशनल ड्रामा, कॉमेडी, रोमान्स यांनी परिपूर्ण आहे असे ट्रेलर पाहून लक्षात येते. ट्रेलरमध्ये सुरुवातीला रोमान्स, कॉमेडी, फॅमिली ड्रामा आणि नंतर ब्रेकअप अशा कथानकाची झलक दाखवण्यात आली आहे. हे संपूर्ण कथानक दिल्लीतील एका मुलाभोवती (रॉकी रंधवा) फिरते ज्याला पैशांची उधळपट्टी करायला आवडते परंतु, पुढे हा रॉकी राणीच्या प्रेमात पडतो. दोघेही कुटुंबीयांबरोबर जुळवून घेण्यासाठी प्रत्येकी ३-३ महिने एकमेकांच्या घरी राहण्याचा निर्णय घेतात. पुढे दोघांसमोर काय आव्हाने येणार हे चित्रपट पाहूनच कळेल.

हेही वाचा : “Happy Anniversary मालकीण!”, अमेय वाघने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बायकोसाठी शेअर केली रोमॅंटिक पोस्ट

आलिया भट्ट, रणवीर सिंह यांच्याशिवाय या चित्रपटात दिग्गज अभिनेत्री जया बच्चन, अभिनेते धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान, ‘रॉकी और रानी…’च्या निमित्ताने करण जोहरने तब्बल ७ वर्षांनी दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली असून, २८ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader