Deepika Padukone : बॉलीवूडमधील बेस्ट कपल रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांच्या कामाचे कायम चाहत्यांकडून कौतुक केले जाते. दोघेदेखील मनोरंजन विश्वात दमदार कामगिरीने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. अशात नुकतीच या जोडप्याच्या संपत्तीबद्दल एक अपडेट समोर आली आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने त्यांचे एक घर भाड्याने दिले आहे. या घराचे भाडे लाखोंच्या किंमतीत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्क्वेअर यार्ड्सवर आलेल्या मालमत्तेच्या नोंदनीनुसार, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहचे मुंबईतील प्रभादेवी परिसरात एक सुंदर घर आहे. हे घर त्यांनी आता भाड्याने दिले आहे. तीन वर्षांसाठी त्यांनी घर भाड्याने दिले असून या घरासाठी त्यांना प्रतिमहिना तब्बल ७ लाख रुपये भाडे मिळणार आहे.

हेही वाचा :शाहरुख आणि सलमानच्या ‘त्या’ प्रँकमुळे घाबरले होते सेटवरचे लोक; ‘करण अर्जुन’ चित्रपटाच्या सेटवर काय घडलेलं? दिग्दर्शक म्हणाले…

दीपिका आणि रणवीर सिंहचे हे घर ब्यूमोंडे टावर्स को- ऑपरेटिव हाउसिंग सोसायटी लिमिटेडमध्ये आहे. या अपार्टमेंटचे मालक अरुणा बाबुलाल वर्मा आहेत. दीपिका आणि रणवीरने भाड्याने दिलेल्या घराचा कार्पेट परिसर २,३१९ चौरस फूट इतका आहे. तसेच हे घर अपार्टमेंटमध्ये २४ व्या माळ्यावर आहे. यासाठी दीपिका आणि रणवीरने १३ नोव्हेंबरला रजिस्ट्रेशन केले आहे. एकूण ३६ महिन्यांसाठी हा करार झालेला आहे. पहिल्या १८ महिन्यांसाठी मासिक भाडे ७ लाख रुपये असून यानंतर यात वाढ होईल. पुढच्या उर्वरित १८ महिन्यांसाठी हे मासिक भाडे ७.३५ लाख एवढे असेल अशी माहिती SquareYards वरून देण्यात आली आहे. या व्यवहारासाठी ६६,२०० रुपये मुद्रांक शुल्क आणि १००० रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे.

दीपिका आणि रणवीरच्या घराचं वैशिष्ट्य

बॉलीवूड जोडप्याचे हे घर मुंबईच्या प्रभादेवी परिसरात आहे. मध्य मुंबईतील अगदी प्रशस्त परिसर म्हणून याची ओळख आहे. येथून दादर चौपाटी, प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर अगदी जवळ आहे. हा परिसर पश्चिम आणि मध्य उपनगरांना जोडलेला आहे. तसेच वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि वांद्रे-वरळी सी लिंक सारख्या महत्वाच्या रस्त्यांनादेखील हा परिसर जोडलेला आहे. येथून मुंबईतील प्रत्येक ठिकाणी अगदी कमी वेळात आणि झटपट पोहचता येते.

मन्नतच्या शेजारी घेतले घर

Zapkey.com वर असलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२४ मध्ये, दीपिका पादुकोणच्या फर्म केए एंटरप्रायझेसने १८४५ चौरस फुटांची एक मालमत्ता १७.८ कोटी रुपयांत खरेदी केली आहे. इतकेच नाही तर दीपिकाने रेशम को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये १५ व्या मजल्यावर देखील एक घर खरेदी केले आहे. तिचे हे घर शाहरुखच्या मन्नतच्या शेजारीच आहे. याच्या बिल्डअप परिसराची किंमत ९६,४०० रुपये प्रति चौरस फूट इतकी आहे. या घराच्या स्टँप ड्यूटीसाठी १.०७ कोटी रुपये लागले, तर रजिस्टेशनसाठी ३०,००० रुपये लागल्याचे कागदपत्रात नमूद आहे.

हेही वाचा : प्रदर्शनाआधीच अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ने कमावले ‘इतके’ कोटी! पठाण आणि टायगरला सुद्धा टाकलं मागे

अलिबागमध्येही आहे घर

दीपिका आणि रणवीरने अलिबागच्या मापगाव येथेदेखील एक बंगला खरेदी केला आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये त्यांनी ही मालमत्ता खरेदी केली. ५ बीएचके असलेला हा बंगला त्यांनी २२ कोटी रुपयांत खरेदी केला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh and deepika padukone rental apartment in prabhadevi 3 years for 7 lakh rupees per month rsj