अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग ही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहणारी जोडी आहे. नुकताच या दोघांनी लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला. दीपिका आणि रणवीर सध्या त्यांच्या आगामी चित्रपटांचं शूटिंग आणि इतर प्रोजेक्टमध्ये बिझी आहेत. दोघंही कामानिमित्त अनेकदा एकमेकांपासून दूर राहतात. पण अशा वेळी सोशल मीडियावर मात्र दोघंही सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत एकमेकांचं कौतुकही करताना दिसतात. दीपिका पदुकोणने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक लाइव्ह सेशन घेतलं होतं. त्यावेळीही असंच काहीसं घडलं. या लाइव्ह सेशनमध्ये रणवीरने दीपिकाला चक्क खासगी प्रश्न विचारला.
दीपिका पदुकोणने अलिकडेच तिचा सेल्फ केअर ब्रॅन्ड लॉन्च केला आहे. नुकत्याच केलेल्या लाइव्ह सेशनमध्ये तिने आपल्या प्रोडक्ट्सची झलक चाहत्यांना दाखवली. या लाइव्ह सेशनमध्ये ती तिचा ब्रॅन्ड आणि प्रॉडक्ट्सबद्दल बोलताना दिसली. आपले प्रॉडक्ट्स दाखवताना दीपिकाने त्यांच्या फायद्यांबद्दलही सांगितलं. दीपिकाचं हे लाइव्ह सेशन रणवीरही पाहत होता आणि यादरम्यान तो यावर कमेंट्सही करताना दिसला. काही वेळा त्याने दीपिकाला प्रोत्साहन दिलं तर काही वेळा मजेदार प्रश्नही विचारले.
आणखी वाचा-“सेक्स माझ्यासाठी गरजेचं…” जेव्हा विनोद खन्ना यांनी शरीरसंबंधांबद्दल केलेलं बोल्ड वक्तव्य
दीपिका तिच्या लाइव्ह सेशनमध्ये ब्रॅन्ड आणि प्रॉडक्टबद्दल सांगत असतानाच रणवीरने त्यावर कमेंट केली, “व्वा, व्वा उत्साह तर पाहा.” त्यानंतर काही वेळाने पुन्हा त्याने कमेंट करताना लिहिलं, “हो, प्रत्येकाने लक्षात ठेवा ती खूप मेहनत करते.” या लाइव्ह सेशनमध्ये कमेंट करत असताना रणवीरने दीपिकाच्या ब्रॅन्डचं कौतुकही केलं. “हे सर्व प्रोडक्ट वर्ल्ड क्लास आहेत.” त्यानंतर काही वेळाने त्याने दीपिकाला भर लाइव्हमध्ये खासगी प्रश्न विचारला. कमेंटमध्ये त्याने तिला, “तू घरी कधी येणार आहेस?” असा प्रश्न विचारला आहे.
आणखी वाचा- ‘या’ कारणावरून रणवीरचं मेहुणी अनिषाशी होतं भांडण, म्हणाला “घरातील वातावरण नेहमीच गरम…”
दरम्यान रणवीर सिंगच्या कामाबद्दल बोलायचं तर तो आगामी काळात रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात पूजा हेगडे आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय वरुण शर्माही या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय रणवीरकडे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट आहे. ज्यात अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असून धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आजमी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे दीपिका पदुकोण ‘पठाण’, ‘फायटर’ आणि प्रभासच्या ‘प्रोजेक्ट के’मध्ये दिसणार आहे.