बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा नेहमी त्याच्या लक्षवेधी कपड्यांसाठी ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून रणवीर हा सातत्याने चर्चेत आहे. प्रसिध्द दिग्दर्शक रोहित शेट्टी याचा सर्कस चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग हा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या तो चर्चेत आहे. नुकतंच एका मुलाखतीत रणवीरने त्याच्या खासगी आयुष्य आणि मुंबईतील घर याबद्दल भाष्य केले आहे.

रणवीर सिंग हा कायमच लग्झरी लाइफ जगताना दिसतो. त्याचे स्टायलिश लूक अनेकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतात. काही महिन्यांपूर्वी रणवीरनं मुंबईतील वांद्रे स्थित रेसिडेन्शियल टॉवर सागर रेशममध्ये एक आलिशान आपार्टमेंट विकत घेतलं होते. विशेष म्हणजे हे आपार्टमेंट शाहरुख खानचं घर मन्नत आणि सलमान खानचं ‘गॅलॅक्सी’ अपार्टमेंट याच्या शेजारीच आहे. त्यामुळे आता हे तीन सुपरस्टार आता एकमेकांचे शेजारी झाले आहेत. रणवीर सिंगच्या या आलिशान घराची किंमत ११९ कोटी रुपये एवढी इतकी आहे.
आणखी वाचा : “…म्हणूनच आम्ही अलिबागमध्ये घर खरेदी केले” रणवीर सिंगने केला खुलासा

Burglary at Mayur Colony in Kothrud property worth Rs 4.5 lakh stolen
कोथरुडमधील मयूर कॉलनीत घरफोडी, साडेचार लाखांचा ऐवज चोरीला
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
CIDCO houses expensive navi mumbai, president Sanjay Shirsat
घरांचे दर ठरविताना अध्यक्षांना विश्वासात घेतले नव्हते का? सिडकोच्या सोडत प्रक्रियेतील संतप्त अर्जदारांचा सवाल
CIDCO announced rates of 26 thousand houses in Navi Mumbai
परवडणारे घर ७४ लाखांचे! सिडकोच्या अल्प उत्पन्न घरांचे दर पाहून अर्जदार अवाक्
Three generations of 74 Panvel tribal families remain homeless
तीन पिढ्यांच्या वास्तव्यानंतर आदिवासी हक्काच्या घरापासून वंचित, पनवेलच्या विकास आराखड्यातील हरकतीवर सुनावणी
BDD chawl redevelopment, houses Worli ,
बीडीडी चाळ पुनर्विकास : वरळीतील ५५० घरांचा ताबा मार्चमध्ये, म्हाडाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात घरांच्या वितरणाचा समावेश
Shelu and Wangani housing project opposed by mill worker
वांगणीतील घरे नापसंत, प्रकल्प रद्द करण्याची गिरणी कामगारांच्या संघटनांची मागणी, तर शेलूतील घरांच्या किमती सहा लाख करा, मुख्यमंत्र्यांना पत्र
cidco navi mumbai house rates marathi news
Cidco Homes Price List: नवी मुंबईतल्या परवडणाऱ्या घरांच्या किमती अखेर जाहीर; वाचा घरांच्या दरांची परिसरनिहाय यादी!

या घराबद्दल रणवीर सिंगने अनेक खुलासे केले आहेत. एका मुलाखतीत त्याला मुंबईच्या घराबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तो म्हणाला, “दीपिका आणि माझे लग्न १४ नोव्हेंबर २०१८ मध्ये झाले. लग्न झाल्यानंतर मी तिच्या घरी राहायला गेलो. गेली चार वर्षे मी तिथेच राहतोय. पण आता आम्ही एकत्र घर खरेदी केले आहे. हे आमचे पहिलं एकत्र खरेदी केलेले घर आहे. आम्ही दोघंही कामात व्यस्त असतो. आम्ही शूटींगच्या निमित्ताने बाहेर असतो. पण तिला घरात राहणे फार आवडते. त्यामुळे आम्ही जास्त बाहेर जात नाही. अनेकदा आम्ही घरीच एकमेकांबरोबर वेळ घालवणे पसंत करतो.”

आणखी वाचा : पहिली भेट, फ्लर्ट, गुपचूप साखरपुडा; दीपिका-रणवीरची Untold ‘लव्ह स्टोरी’

दरम्यान रणवीर सिंगच्या या आलिशान घराची किंमत ११९ कोटी रुपये इतकी आहे. त्याचं हे घर १६ व्या मजल्यापासून ते १९ व्या मजल्यापर्यंत आहे. रणवीरनं एकूण ४ मजले विकत घेतले आहेत. तो आता या ४ मजल्यांचा मालक आहे. हे घर एकूण ११, २६६ स्क्वेअर फूटच्या कार्पेट एरियामध्ये आहे. याशिवाय १,३०० स्केअर फूटचं छत आहे. या बिल्डिंगमध्ये १९ कार पार्क करण्याची सुविधा देखील रणवीरला मिळाली आहे.

रणवीर सिंगनं ११८.९४ कोटी रुपये आपार्टमेंट विकत घेताना दिले आहेत. ते ७.१२ कोटी रजिस्ट्रेशनच्या स्टॅम्प ड्यूटीसाठी दिले आहे. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना वांद्रे येथील रियलटर्सनं सांगितलं की, ही बिल्डिंग रिडेव्हलप करण्यात आली आहेत. खालचे सर्व मजले हे जुन्या रेसिडंटसाठी देण्यात आले आहेत. तर १६ मजला हा ४ बीएचके आहे. तर इतर तीन मजले हे पेंटहाऊस आहेत.

Story img Loader