‘सिंघम अगेन’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर फक्त याच सिनेमाच्या चर्चा सुरू आहेत. पाच मिनिटांचा मोठा ट्रेलर ते बॉलीवूडमधील आघाडीचे अभिनेते आणि अभिनेत्री यांना घेऊन तयार करण्यात आलेला हा सिनेमा या कारणांमुळे या चित्रपटाची सध्या चर्चा आहे. रामायणाचा संदर्भ घेत तयार करण्यात आलेला हा सिनेमा मल्टीस्टारर आहे. अजय देवगण, करीना कपूर खान, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह व टायगर श्रॉफ यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमात अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत आहे. मुंबईत नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँचिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यात अभिनेता रणवीर सिंहने त्याचा कोणत्या अभिनेत्यावर क्रश आहे हे ते सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रणवीर सिंह ‘सिंघम अगेन’च्या स्टारकास्टबरोबर ट्रेलर लाँचसाठी पोहोचला. या चित्रपटात दीपिका पदुकोणसुद्धा आहे; मात्र ती या इव्हेंटला हजर नव्हती. रणवीरने सांगितले, “ती आमच्या मुलीबरोबर व्यग्र आहे. म्हणून ती इथे येऊ शकली नाही.” दीपिकाच्या भूमिकेबद्दल रणवीर म्हणाला, “माझी बायको खूप क्लासी आहे; पण जेव्हा ती मास अवतारमध्ये येते ना, तेव्हा मला सगळ्यात जास्त आनंद होतो. आणि हा मास अवतार फक्त रोहित शेट्टीच आणू शकतो.”

हेही वाचा…‘सिंघम अगेन’चा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का? ५ मिनिटांचा ट्रेलर कापण्यासाठी रोहित शेट्टीने घेतले तब्बल ‘एवढे’ दिवस

‘हा’ अभिनेता माझा क्रश : रणवीर सिंह

‘सिंघम अगेन’मध्ये रणवीर पहिल्यांदाच टायगर श्रॉफबरोबर काम करीत आहे. ट्रेलर लाँचिंग सोहळ्यात रणवीर सिंहने टायगर श्रॉफचं कौतुक केलं. तो म्हणाला, “पहिल्यांदाच मी माझ्या मॅन क्रश वंडर बॉय (टायगर)बरोबर स्क्रीन शेअर करीत आहे. मी त्याचा खूप मोठा चाहता आहे. जगात त्याच्यासारखा कुणीही नाही. तो अतिशय कौशल्यवान आहे. मायकेल जॅक्सनसारखे डान्स करणे किंवा ब्रूस लीसारखी फाईट करणे, यात तो निपुण आहे. त्याच्यासह काम करण्याची मला संधी मिळाल्यामुळे मी अत्यंत आनंदी आहे.”

रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर १० वर्षांनी एकत्र

रणवीर आणि अर्जुन कपूर ‘सिंघम अगेन’ सिनेमात एकत्र काम करीत असून, १० वर्षांनी ते मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. अर्जुनबरोबर पुन्हा काम करण्याच्या अनुभवाबद्दल सांगताना रणवीर म्हणाला, “अर्जुन माझ्या डोळ्यांचा तारा आहे. तो माझा लाडका आहे आणि आम्ही १० वर्षांनंतर पुन्हा एकत्र स्क्रीन शेअर करीत आहोत.” १० वर्षांपूर्वी रणवीर सिंह आणि अर्जुन कपूरने ‘गुंडे’ या सिनेमात एकत्र काम केलं होतं.

हेही वाचा…Video : “आमची बेबी सिम्बाही करणार चित्रपटात पदार्पण”, ‘सिंघम अगेन’च्या ट्रेलर लाँचप्रसंगी रणवीर सिंहचं लेकीबद्दल वक्तव्य

करीना म्हणते मी रोहितच्या चित्रपटात असणारच

‘सिंघम अगेन’मध्ये करीनाची मुख्य भूमिका असून, ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये बोलताना ती म्हणाली, “जशी रामायणात सीता नसणं शक्य नाही, तसंच रोहित शेट्टीच्या चित्रपटात करीना नसणंही शक्य नाही. मला कायम साथ दिल्याबद्दल रोहित आणि अजयचे मनःपूर्वक आभार.”

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ सिनेमा १ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा ‘सिंघम’ सिनेमाचा तिसरा भाग आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh confesses his man crush on tiger shroff at singham again trailer launch psg