बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतात. ऑनस्क्रीन असो वा ऑफस्क्रीन दोघांच्या केमिस्ट्रीची नेहमीच चर्चा होताना दिसते. दोघंही सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर बिनधास्तपणे कमेंट्सही करताना दिसतात. तसेच सार्वजनिक ठिकाणीही हे दोघंही अनेकदा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. आताही काहीसं असंच घडलं आहे. एका मुलाखतीत रणवीरने दीपिकाबरोबर असं काही केलं ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला दिसत आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ बराच व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात दीपिका पदुकोण ‘टाइम’ मासिकासाठी मुलाखत देताना दिसत आहे. दीपिकाची मुलाखत सुरू असतानाच रणवीर तिला सरप्राइज देण्यासाठी स्टुडिओमध्ये येतो आणि त्यानंतर जे काही होतं ते या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान झाली आई, पोस्ट करत म्हणाली “आम्हाला आनंदाचा खरा अर्थ…”
या व्हायरल व्हिडीओमध्ये रणवीर सिंग पत्नी दीपिका पदुकोणला सरप्राइज देण्यासाठी तिच्या मुलाखतीच्या स्टुडिओमध्ये आलेला दिसत आहे. त्यानंतर दोघं एकमेकांचे हात पकडतात आणि अचानक एकमेकांना लिप लॉक किस करतात. त्यानंतर रणवीर तिथून निघून जातो. दीपिका आणि रणवीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर या दोघांच्या चाहत्यांच्या कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे.
आणखी वाचा : “याकडे लक्ष देण्यापेक्षा मी…” भगवी बिकिनी ते ‘पद्मावत’ला झालेला विरोध; दीपिका पदुकोणची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान अलिकडेच रणवीर आणि दीपिका भूटान येथे व्हेकेशनसाठी गेले होते. या व्हेकेशनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. व्हेकेशनवरून पुन्हा भारतात परतल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाने पती रणवीर सिंगचं खूप कौतुक केलं होतं. ती म्हणाली होती, “मी जेव्हा रणवीरबरोबर असते तेव्हा माझा वावर खूपच सहज असतो. त्याने नेहमीच मला, माझ्या स्वप्नांना आणि माझ्या गरजांना सर्वात आधी प्राधान्य दिलं आहे.”