अभिनेत्री दीपिका पदुकोण व रणवीर सिंह बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल आहे. ऑनस्क्रीनबरोबरच ऑफस्क्रीन केमिस्ट्रीमुळे दोघे नेहमीच चर्चेत असतात. लवकरच आई-बाबा होणाऱ्या या कपलचा एक फोटो नुकताच व्हायरल झाला होता. अशातच रणवीरने दीपिका आणि त्याचे लग्नातले फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून डिलीट केले आहेत.

मंगळवारी रणवीर सिंहने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून दीपिका आणि रणवीरचे जुने फोटो डिलीट केले किंवा लपवले आहेत, अशी चर्चा सुरू आहे. जानेवारी २०२३ पासूनचे त्यांचे सगळे जुने फोटो अभिनेत्याने डिलीट केले. यामध्ये या कपलच्या लग्नातले फोटोही गायब झाले आहेत. जरी २०१८ मधील त्यांच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्राम प्रोफाईलवर नसले, तरी अलीकडचे त्यांचे दिवाळी सेलिब्रेशनचे आणि लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आहेत. अभिनेत्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एकूण १३३ पोस्ट्स आहेत.

Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Whose Hand on Rishabh Pant Shoulder Indian Cricketer Solved Mystery Behind 6 Years Old Viral Photo of 2019 World Cup
Rishabh Pant: ऋषभ पंतच्या खांद्यावर कोणाचा हात होता? ६ वर्ष जुन्या फोटोमागचं रहस्य अखेर उलगडलं, पंतने दिलं उत्तर
Irfan Pathan Showed how Cameraman zoom on fans during live cricket match watch video
Irfan Pathan : लाइव्ह मॅचमध्ये चाहत्यांवर कसा झूम होतो कॅमेरा? इरफान पठाणने शेअर केला खास VIDEO
Marathi Actor Visited Maha Kumbh Mela 2025
“प्रयागराजच्या पवित्र भूमीवर…”, महाकुंभ मेळ्याला पोहोचला ‘हा’ मराठमोळा अभिनेता; नेटकरी म्हणाले, “भाग्यवान आहेस…”
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा… गुड न्यूज दिल्यानंतर पहिल्यांदाच दिसला दीपिका पदुकोणचा बेबी बंप; अभिनेत्रीचा अनसीन फोटो व्हायरल

रणवीरच्या फोटो डिलीट करण्यामागे सोशल मीडिया स्ट्रॅटेजी असण्याची दाट शक्यता आहे. या जोडप्यासाठी हे नवीन नाही, कारण यापूर्वीदेखील दीपिका पदुकोणने असंच काहीतरी केलं होतं. अभिनेत्रीने तिच्या सगळ्या पोस्ट डिलीट केल्या होत्या. ३१ डिसेंबर २०२० रोजी तिने तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरील एकूण एक पोस्ट डिलीट केली होती आणि एका ऑडिओ क्लिपद्वारे नवी सुरुवात केली होती.

रणवीरने डिलीट केलेले फोटोज दीपिकाच्या प्रोफाईलवर आधी दिसत नव्हते, परंतु नंतर बाकीचे फोटो सोडून केवळ लग्नाचे फोटो दिसले.

नुकतेच दीपिकाच्या बेबी बंपचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोजमध्ये रणवीर आणि दीपिका एका जहाजातून उतरताना दिसत होते. दीपिकाने या फोटोमध्ये लूज टीशर्ट ड्रेस आणि निळ्या रंगाची जिन्स परिधान केली होती, तर रणवीर सिंगने ऑल व्हाईट लूकची निवड केली होती. या फोटोमध्ये दीपिकाचं बेबी बंप दिसतंय असं चाहते म्हणत होते. रणवीर आणि दीपिकाचा हा अनसीन फोटो रेडीटवर व्हायरल झाला होता.

हेही वाचा… ठरलं तर मग: “सरांच्या मनात माझ्याविषयी प्रेम…”, अर्जुनच्या प्रेमात पडलेली सायली होणार कुसुमसमोर व्यक्त; प्रोमो पाहून चाहते म्हणाले, “फालतूगिरी…”

लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका आणि रणवीर आई-बाबा होणार आहेत. २९ फेब्रुवारीला याबाबत दीपिका-रणवीरने चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली होती. या कपलने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये ‘सप्टेंबर २०२४’ असे लिहिले होते आणि त्याच्या खाली तिचे व रणवीरचे नाव लिहिले होते. तसेच या पोस्टमध्ये लहान बाळाचे कपडे व खेळण्यांचे चित्रही रेखाटले होते.

हेही वाचा… “तुमचं वय काय, तुम्ही करताय काय?”, ऐश्वर्या नारकरांनी ‘त्या’ व्हिडीओवर केलेल्या ट्रोलिंगला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाल्या, “बोलण्यात ताकद…”

दरम्यान, दीपिका पदुकोणच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर दीपिका नुकतीच ‘फायटर’मध्ये झळकली होती. ‘सिंघम अगेन’ या आगामी चित्रपटातदेखील दीपिका दिसणार आहे, तर रणवीर सिंह ‘डॉन-३’ या चित्रपटात कियारा अडवाणीबरोबर झळकणार आहे.

Story img Loader