अभिनेता रणवीर सिंग हा त्याच्या उत्साहाने आणि त्याच्या अतरंगी स्टाईलने नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. चाहत्यांबरोबरच मीडियामध्येही तो प्रसिद्ध आहे. त्याचा नम्र स्वभाव आणि त्याचा दिलखुलासपणा सर्वांनाच आवडतो. पण गेल्या वर्षी त्याचे चित्रपट यशस्वी होऊ शकले नाहीत. अशातच आता त्याने केलेल्या एका कृतीमुळे तो ट्रोल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रणवीर बऱ्याचदा विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी दिसतेय दिसतो. त्याचप्रमाणे त्याचे फोटो काढायला आलेल्या मीडिया फोटोग्राफर्सनादेखील तो दरवेळी पोज देतो. पण यावेळी मात्र त्याने तसं केलं नाही. त्याने दाखवलेल्या अ‍ॅटिट्यूडमुळे तो आता नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.

आणखी वाचा : आलिया भट्ट पुन्हा गरोदर? फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, “२.०…”

रणवीर सिंगला नुकतंच यशराज फिल्म्सच्या ऑफिस बाहेर पाहण्यात आलं. यावेळी तो त्याच्या गाडीत बसला होता. जेव्हा मीडिया फोटोग्राफर्स त्याचे फोटो काढण्यासाठी आले तेव्हा त्याने पेन आणि एक पेपर घेऊन काहीतरी लिहायला सुरुवात केली. त्याने फोटोग्राफर्सना त्याचे फोटो काढू दिले नाहीत. आता त्याच्या या कृतीवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा : रणवीर सिंगने मुंबईच्या रस्त्यावर दाखवली त्याच्या ऍस्टन मार्टिन गाडीची झलक, किंमत वाचून व्हाल थक्क

ह्या व्हायरल व्हिडिओवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिलं, “काम तर काही करत नाही फक्त काम करण्याची अ‍ॅक्टिंग करतो.” तर दुसऱ्याने लिहिलं, “त्याची सगळी ऊर्जा निघून गेली आहे, एकापाठोपाठ एक फ्लॉप चित्रपट दिले ना!” तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “बघा, मीडियाला बघताच कसा काम करण्याचा अभिनय करू लागला आहे.” आता त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh got troll because of his attitude rnv