बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि आलिया भट्ट त्यांच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. दोघेही सध्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यग्र आहेत. नुकत्याच झालेल्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये रणवीरने त्याच्या शालेय दिवसातील एक किस्सा सांगितला आहे. रणवीर त्याला एकदा शून्य गुण मिळाले होते, असा खुलासा केलाय. त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
सेक्स करताना भगवद्गीतेचं वाचन; ‘ओपनहायमर’मधील त्या सीनवर भडकले नेटकरी; म्हणाले “लाज वाटली…”
रणवीर आणि आलिया चित्रपट निर्माता करण जोहरसोबत इंटरनॅशनल मुव्हमेंट टू युनायटेड नेशन्स कार्यक्रमात चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. तिथे त्यांनी जवळपास १०० शहरांमधील ५० हजार मुलांशी संवाद साधला. यावेळी रणवीरने मुलांना विचारलं की त्यांना १०० पैकी शून्य आणि उणे (मायनस) १० गुण मिळाले आहेत का?
रणवीर सिंह म्हणाला, “मी असे नंबर आणले आहेत. मला एकदा गणिताच्या पेपरमध्ये शंभरपैकी शून्य मार्क्स मिळाले होते, एवढंच नाही तर बोलत होतो, त्यामुळे मॅडमने माझे मायनस १० नंबर कापले होते.” रणबीरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहते विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत.
दरम्यान, रणवीर आणि आलियाचा हा चित्रपट २८ जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटात रणवीर एका श्रीमंत पंजाबी मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर आलिया भट्ट बंगाली मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट करण जोहरने दिग्दर्शित केला आहे. चित्रपटात धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्याही मुख्य भूमिका आहेत.