अभिनेता रणवीर सिंह सध्या दुबईमध्ये आहे. दुबईमधील अबू धाबी शहरात ‘एनबीए’ म्हणजेच ‘नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन’ या संस्थेने ‘एनबीए आबू दाबी गेम्स २०२२’चे आयोजन केले आहे. रणवीर सिंह एनबीए इंडियाचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहे. त्यामुळे त्याला या कार्यक्रमाचे खास आमंत्रण होते. बास्केटबॉलचे सामने पाहण्यासाठी रणवीरने दुबई गाठली. तेथे सुरु असलेल्या एका सामन्यादरम्यान तो आर. माधवनला भेटला. माधवनसुद्धा या खेळाचा चाहता आहे. त्यांनी एकत्र काढलेला सेल्फी माधवनने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माधवन प्रमाणेच रणवीरदेखील सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. त्याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो बास्केटबॉलपटू ग्यानीस अँटेटोकोनम्पोसह (Giannis Ugo Antetokounmpo) नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. रणवीर सिंहने त्याच्या ‘गोलीयों की रासलीला: रामलीला’ या चित्रपटातील ‘ततड ततड’ या लोकप्रिय गाण्याच्या काही स्टेप्स एनबीए स्टार ग्यानीसला शिकवत त्यांच्यासह डान्स केला. नाचून झाल्यानंतर त्यांनी मिठी मारत एकमेकांना निरोप देताना दिसले.

आणखी वाचा – ‘गुडबाय’ चित्रपटासाठी विकास बहल यांनी मानले क्रिती सेनॉनचे विशेष आभार, जाणून घ्या काय आहे कनेक्शन

आणखी वाचा – “पांढऱ्या केसांचा भिकारी…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे निर्माते स्वतःबाबत असं का बोलले? व्हिडीओ चर्चेत

बॉलिवूड सेलिब्रिटींपासून क्रिडा विश्वातील अनेक मान्यवरांनी त्याच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सामने संपल्यानंतर तो तेथे उपस्थित असलेल्या दिग्गज बास्केटबॉलपटूंना भेटला. रणवीरने त्यांच्यासह फोटो काढत ते इन्स्टाग्राम स्टोरीला पोस्ट केले आहेत. पुढे तो तेथील चाहत्यांना भेटला. त्याने चाहत्यांबरोबर फोटो देखील काढले.

मे २०२२ मध्ये त्याचा ‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट चांगला असूनही केवळ प्रदर्शनाआधी योग्यप्रकारे प्रसिद्धी न केल्याने तो फ्लॉप झाला. त्याचे ‘सर्कस’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.